घरमहाराष्ट्र'या'साठी साजरी केली जाते होळी

‘या’साठी साजरी केली जाते होळी

Subscribe

मार्च महिना सुरू झाला की, सर्वाना उत्सुकता लागते ती होळी सणाची. विशेषकरून हा सण उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जाणार सण आहे. मात्र, प्रत्येक देशामध्ये तेवढ्याच उत्साहाने होळी हा सण साजरा केला जातो.

मार्च महिना सुरू झाला की, सर्वांना उत्सुकता लागते ती होळी सणाची. वर्षातून एकदा येणारा हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे. होळी देशभर साजरा केला जाणारा सण आहे. विशेषकरून हा सण उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जाणार सण आहे. या सणाला ‘होळी पौर्णिमा’ म्हणून संबोधले जाते. काही ठिकाणी होळी, धूळवड आणि रंगपंचमी अशी सणाची विभागणी करून साजरी केली जाते. तर काही ठिकाणी एकत्रितपणे हा सण साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमा या दिवसापासून पंचमीपर्यंत म्हणजेच ५ ते ६ दिवसांपर्यंत तर काही ठिकाणी २ दिवस हा सण साजरा केला जातो.

कशी साजरी केली जाते?

होळी या सणाला होलिकादहन, होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, आणि दोलायात्रा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये होळीच्या दिवशी काही लाकडे मंत्रोच्चाराचात जाळण्यात येतात. तसेच पेटलेल्या होळीच्याभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. जळत्या होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविले जातात. तसेच नैवेद्य हा पोरणपोळीचा सुद्धा दिला जातो. होळच्या दुसऱ्या दिवशी धुलवड आणि त्यानंतर ५ दिवसांनी रंगपंचमी खेळली जाते. एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण केली जाते. बंधुभाव वाढवणे, सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी होळी हा सण साजरा केला जातो. गरिब, श्रीमंत हा भेदभाव केला जात नाही. त्यामुळेच एकतेचे प्रतिक म्हणून या सणाकडे पाहिले जाते.

- Advertisement -

होळी या सणाची आख्यायिका

एक पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवीचा श्रीविष्णू यांनी वध केला होता. मात्र, होलीकादेवी यांना वर होता की, त्या आगीत जळू शकणार नाही. परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले, अशी या होळीसणाची आख्यायिका प्रचलित आहे. तर, विज्ञानाच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजन परंपरेचा अविष्कार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -