घरगणपती उत्सव बातम्याडीजे बंदीचा निर्णय पुण्याचे गणेशोस्तव मंडळ धुडकावणार?

डीजे बंदीचा निर्णय पुण्याचे गणेशोस्तव मंडळ धुडकावणार?

Subscribe

मुंबई हायकोर्टाने डॉल्बी आणि डीजेवर बंदी घातली आहे. तरी देखील पुण्यामध्ये टीळकरोडवर डीजेचे रेक उभे करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान पुण्यात डीजे वाजवून गणेशोत्सव मंडळ कोर्टाच्या नियमाचे उल्लंघन करण्याची शक्यता आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे आणि डॉल्बीवर मुंबई हायकोर्टाने बंदी घातली आहे. मात्र पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ही बंदीचे उल्लंघन करण्याची शक्यता आहे. कारण पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान टीळकनगर रोडवर डीजेचे रेक एकामागे एक उभे राहिलेले पहायला मिळत आहे. डीजे आणि डॉल्बीमुंळे होणाऱ्या त्रासाला लक्षात घेता हायकोर्टाने डीजे आणि डॉल्बी वाजवण्याची परवानगी नाकारत बंदी कायम ठेवली होती. मात्र कोर्टाच्या या बंदीला अनेक गणेशोत्सव मंडळांनी विरोध केल्याचे पहायला मिळाले होते.

डीजे नाही तर विसर्जन नाही

गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेला परवानगी दिली नाही. मात्र पुणेकरांनी डीजेसाठी हट्ट धरला होता. ‘डीजेला परवानगी दिली नाही, तर बाप्पांचे विसर्जन करणार नाही’, असा पवित्रा पुण्याताली अनेक गणेश मंडळांनी घेतला आहे. मिरवणुकीत डीजे वाजवण्यासाठी परवानगी देण्यासाठी पुण्यातील गणेश मंडळ एकत्र आली होती. या मंडळांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन डीजेला परवानगी दिली नाही तर बाप्पाचे विसर्जन करणार नाही अशी भूमीका स्पष्ट केली होती.

- Advertisement -

टिळकरोडवर डीजेचे रेक उभे

गणेश विसर्जना दरम्यान डीजेवर बंदी घातली होती. याला साताऱ्याचे खासदार उद्यन राजे भोसले यांनी विरोध केला होता. त्या पाठोपाठ पुण्यामध्ये काही मंडळांनी डीजे बंदी विरोधात दंड थोटावले आहेत. आता टीळक रोडवर ही सर्व मंडळं डीजेचे रेक घेऊन लाईनमध्ये उभे राहिले आहे. त्यामुळे कोर्टाने बंदी घालूनही पुण्यात मिरवणुकी दरम्यान डीजेचा दणदणाट होणार असेच चित्र दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -