घरमहाराष्ट्रपुण्यातील सनबर्न फेस्टिवलला समन्वय समितीचा विरोध

पुण्यातील सनबर्न फेस्टिवलला समन्वय समितीचा विरोध

Subscribe

पुण्यात आयोजित केला जाणारा सनबर्न फेस्टिवल रद्द करावा, अशी मागणी पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

पुण्यात आयोजित केला जाणारा सनबर्न फेस्टिवल रद्द करावा, अशी मागणी पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे. पुणे शहरात दहीहंडी आणि गणेशोत्सवाला पोलिसांकडून वेगवेगळे निर्बंध लावण्यात येतात. मात्र, सनबर्नसारख्या कार्यक्रमांना कुठल्याही प्रकारचे निर्बंध घातले जात नाही, असे म्हणत समितीने या कार्यक्रमालाच विरोध दर्शवला आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सावेळी डॉल्बी आवाजाच्या संदर्भामध्ये कठोर निर्बंध घालून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात. परंतु, सनबर्नच्या आयोजकांवर कुठेही गुन्हा दाखल केले जात नाहीत. त्यामुळे सरकारचे हे दुटप्पी धोरण दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या बाबतच आहे. सनबर्न या कार्यक्रमांच्या माध्यमातून सरकारला महसूल मिळतो म्हणुन मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमांना सवलती दिल्या जातात. कुठल्याही प्रकारचे नियम लावले जात नाहीत. मात्र, दहीहंडी गणेशोत्सवासारखे सामाजिक उपक्रम महसूल मिळत नसल्याने त्यावर निर्बंध लावले जातात. तसेच कार्यकर्त्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप समन्वय समितीने केला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -