घरCORONA UPDATECoronavirus: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार? वाचा अजित पवार काय म्हणाले

Coronavirus: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार? वाचा अजित पवार काय म्हणाले

Subscribe

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. चार दिवसांपासून राज्यात ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. शनिवारी सर्वाधिक ५ हजार ७६० रुग्णांचे निदान झाले होते. त्यामुळे दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट तर येत नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली किंवा अहमदाबादप्रमाणे राज्यातही पुन्हा अशंतः लॉकडाऊन घोषित केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मात्र तत्पुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवाळी दरम्यान गर्दीमुळे वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात सध्या शनिवारचे कोरोनाचे आकडे एकत्र करुन एकूण रुग्णसंख्या ही १७ लाख ७४ हजार ४५५ वर जाऊन पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ४६ हजार ५७३ इतकी झाली आहे. आतापर्यंत १६ लाख ४७ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ८० हजार रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे बोलताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता नाकरलेली नाही. राज्य सरकार सद्यस्थितीचा आढावा घेत आहे. पुढील १० ते १५ दिवसांत याबाबत निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. दिल्लीनंतर अहमदाबाद येथे रात्रीचा कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. अजित पवार म्हणाले की, “पुढील परिस्थिती कशी आहे? हे आताच सांगणे कठीण आहे. त्यामुळे यावर काही घोषणा ही परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच करता येईल. याबाबत आज काही भाष्य केले तर लोक आणखी त्रस्त होतील.”

अजित पवार पुढे म्हणाले की, “एकदा करोना झाला म्हणजे पुन्हा होत नाही. हे लोकांनी मनातून काढून टाकले पाहीजे. कोरोना पुन्हा मानगुटीवर बसू शकतो. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी आणि सर्व नियमांचे पालन करावे. तसेच आता करोना आजाराची दुसरी लाट येणार असे अनेक तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाकडून येणार्‍या नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -