घरमहाराष्ट्रसवर्ण आरक्षण टिकणार? पवारांच्या मनात शंका

सवर्ण आरक्षण टिकणार? पवारांच्या मनात शंका

Subscribe

सवर्ण आरक्षण हे संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का लावणारं असल्याचं मत घटनातज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे न्यायालयात ते किती काळ टिकेल? अशी शंका असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

निवडणुकांपूर्वीचा खेळ…
सवर्ण आरक्षणाचा निर्णय हा आगामी निवडणुकांच्या आधीच का घेतला? असा सवालही पवारांनी यावेळी घेतला. पवार म्हणाले की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने बाकी आहेत. यांना जे निर्णय गेल्या ५ वर्षात घेता आले नाहीत, ते निर्णय निवडणुकांच्या तोंडावर कसे घेतले गेले? त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा हा चुनावी जुमला असल्याची शक्यता पवारांनी यावेळी बोलून दाखवली. ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधील पराभावामुळे सावध झालेल्या भाजपने या आरक्षणाच्या युक्त्या शोधून काढल्याचंही पवार यावेळी म्हणाले.

काँग्रेससोबत आघाडीसाठी चर्चा

जागावाटपाबाबत देखील शरद पवारांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. राज्यात ज्याची ताकद जास्त त्या पक्षाला जागा जास्त या सूत्रानुसार जागावाटपही व्हायला हवं, असं मत पवारांनी यावेळी व्यक्त केलं. याशिवाय जागांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी पक्षाची काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली असून, देश पातळीवर नाही पण राज्य पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढवू असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -