घरमहाराष्ट्रहिवाळी अधिवेशन नागपूरमध्येच घ्या, भाजप आमदारांची मागणी

हिवाळी अधिवेशन नागपूरमध्येच घ्या, भाजप आमदारांची मागणी

Subscribe

या आमदारांच्या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे ठरणार

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरू आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा नागपुरातील हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्या, अशी मागणी नागपूर जिल्ह्यातील भाजप आमदारांनी केली आहे. त्यामुळे आता या आमदारांच्या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी हे अधिवेशन नागपुरात घेऊ नये, अशी मागणी केली होती. या मागणीला भाजप आमदारांनी विरोध दर्शवला आहे. याऊलट नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन हे नागपुरात घ्या, अशी मागणी भाजप आमदारांनी केली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडे, समीर मेघे, मोहन मते, प्रविण दटके यांनी याबाबतची मागणी केली आहे. कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेऊन हे अधिवेशन नागपुरात घ्यावे, असेही भाजप आमदार म्हणाले. तसेच मुंबईत अधिवेशन घेण्याच्या हालचालीमुळे हे सर्व भाजप आमदार नाराजीचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. तर नागपुरात येत्या ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र कोरोनामुळे अधिवेशन होणार की नाही, याचा निर्णय सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. पण सध्या नागपुरात अधिवेशनाची तयारी सुरु झाली असल्याची माहिती मिळतेय.


मविआकडून अखेर विधानपरिषदेची १२ नावे ठरली; राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -