घरमहाराष्ट्रलासलगाव: पीडीतेच्या जबाबाने गोंधळ, संशयाची सुई कुटुंबाकडे!

लासलगाव: पीडीतेच्या जबाबाने गोंधळ, संशयाची सुई कुटुंबाकडे!

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बसस्थानकावर प्रेमसंबंधातील वादातून एका 30 वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ही महिला 67 टक्के भाजली असून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सदर महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला मुंबईत हलविण्यात आले आहे. पहाटे तीनच्या सुमारास पीडित महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानं डॉक्टरांनी निर्णय घेतला. मुंबईतील भायखळा येथील मसीना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणानंतर पीडीतेचा जबाब नोंदवण्यात आला, तेव्हा ती म्हणाली, माझ्या पतीचा मला पेटवण्याचा उद्देश नव्हता. आमच्यात सकाळपासून वाद सुरू होता. मी बस स्थानकाजवळ स्कुटीमध्ये पेट्रोल भरत होते. तेव्हा तो आला आणि पुन्हा वाद सुरू झाला. त्यानंतर तो मला म्हणाला की दे मी पेट्रोल गाडीत भरतो. अशात दोघांच्या भांडणात दोघांच्याही अंगावर पेट्रोल सांडलं. त्यानंतर त्याने माचीसची काडी ओढली पण ती माझ्या बाजुला आली आणि त्यावेळी तो घाबरून पळून गेला.’

- Advertisement -

पीडितेच्या या जबाबामुळे प्रकरणात गोंधळ निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे पीडीतेच्या पतीबरोबरच संशयाची सुई पिडीतेच्या कुटूंबाकडेही आहे. कारण, या पीडित महिलेला अधिक उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात सायंकाळी दाखल केल्यानंतर दीड तास उलटून गेले तरी तिच्या कुटुंबातील एकही सदस्य रुग्णालयाकडे फिरकला देखील नाही.

काय घडले नेमके

निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकावर पीडित महिला रसवंतीगृहाजवळ बसची वाट पाहत होती. त्यावेळी अचानक चार अज्ञात तरूणांनी महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवले. या दुर्देवी घटनेमध्ये महिला गंभीर भाजली आहे. सध्या तिला नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

नाशिकच्या लासलगावमध्ये बस स्थानकावर महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून पीडितेच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. तसेच पीडितेवर आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -