पोलिसावर इमोशनल अत्याचार; ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे, ३० लाख रुपये दे’

'मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आपण एकत्र राहु, तू माझ्यासोबत राहिला नाहीस, तर मी आत्महत्या करेन', अशी धमकी देत पोलिसाचा मानसिक छळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Baramati
woman emotional blackmail to police officer
पोलिसावर इमोशनल अत्याचार; 'माझं तुझ्यावर प्रेम आहे, ३० लाख रुपये दे'

प्रेमाचे खोटे नाटक करुन पोलीस कर्मचाऱ्याकडे ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडला आहे. वारंवार इमोशनल अत्याचार करणाऱ्या या महिलेच्या विरोधात अखेर पोलीस कर्मचाऱ्याने बारामती शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव संजय बबन कोठावळे असे आहे. ते पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. कोठावळे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जऊरगावचे स्थानिक आहेत.

हेही वाचा – उत्तर प्रदेशमध्ये ‘या’ गावात महिला करवा चौथचे व्रत करत नाही

पोलिसाचा प्रचंड मानसिक छळचा दावा

संजय कोठावळे यांच्या गावी ९ सप्टेबर २०१९ ते १६ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत ही घटना घडली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आरोपी महिला ही करमाळा तालुक्यातील शेलगांव वांगी येथील आहे. ती सध्या हडपसर येथील ससाणेनगर येथे वास्तव्यास आहे. ती संजय कोठावळे यांना वारंवार फोन करुन त्रास देत असे. या महिलेने कोठावळे यांचा प्रचंड मानसिक छळ केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा – महिलांना प्रसूती लाभ देणारे केरळ ठरणार पहिले राज्य

फ्लॅट घेण्यासाठी ३० लाख रुपयांची खंडणी

‘मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आपण एकत्र राहु, तू माझ्यासोबत राहिला नाहीस, तर मी आत्महत्या करेन’, अशी धमकी महिलेने कोठावळे यांना दिली. ती वारंवार फोन करुन त्रास देत असे. याशिवाय तिने हात कापल्याचे, औषध कपामध्ये ओतून पित आहे असे दाखवणारे फोटो व्हाट्सअॅपवर पाठवल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. आपण दोघे एका फ्लॅटमध्ये राहू असे फ्लॅट घेण्यासाठी तिने ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप कोठावळे यांनी केला आहे.