घरमहाराष्ट्ररुग्णवाहिकेतच महिलेची प्रसुती; १०८ रुग्णवाहिकेच्या चालक, डॉक्टरचे सर्वत्र कौतुक

रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसुती; १०८ रुग्णवाहिकेच्या चालक, डॉक्टरचे सर्वत्र कौतुक

Subscribe

बाळंतपणासाठी रुग्णालयात नेत असतांना महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली. अकोले तालुक्यातील दुर्गम आदीवासी भागात ही घटना घडली. रुग्णवाहिकेतच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेची सुखरुप प्रसुती केली. महिलेने मुलीला जन्म दिला असून बाळ आणि बाळंतीण सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली.

अकोले तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या पुरुषवाडी येथील उषा युवराज सोनवणे या महिलेला मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान प्रसुतीवेदना होऊ लागल्याने तिला तातडीने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात येत होते. रुग्णालयात येत असतांना पुलाची वाडी ते इंदोरी फाटा दरम्यान या महिलेला अधिक त्रास जाणवू लागला. रुग्णवाहिकेचे चालक दत्ता देशमुख यांना महिलेच्या पोटात जास्त दुखत असल्याचे सांगितल्यावर त्यांनी रुग्णवाहिकेचा वेग कमी करत महिलेला त्रास होणार नाही, अशा बेताने रुग्णवाहिका चालविली. यावेळी रुग्णवाहिकेसोबत तातडीच्या उपचारासाठी उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी अनिल चव्हाण यांनी रुग्णवाहिकेमध्येच महिलेची सुरक्षित प्रसुती करत बाळ आणि बाळंतणीची सुटका केली.

- Advertisement -

महिलेला ग्रामीण रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच तीचे बाळंतपण सुरक्षितरित्या यशस्वी करणाऱ्या डॉ. अनिल चव्हाण आणि रुग्णवाहिका चालक दत्ता देशमुख यांचे कौतुक करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -