घरमहाराष्ट्रमहिला शक्तीच्या हाती दहा 'सखी मतदान' केंद्र

महिला शक्तीच्या हाती दहा ‘सखी मतदान’ केंद्र

Subscribe

मुंबई शहर जिल्हयात दहा मतदान केंद्र महिला शक्तीच्या हाती सोपविण्यात येणार असून तेथील संपूर्ण कार्यभार हा सर्व महिला अधिकारी कर्मचारी पाहणार आहेत.

मुंबई शहर जिल्हयात दहा मतदान केंद्र महिला शक्तीच्या हाती सोपविण्यात येणार असून तेथील संपूर्ण कार्यभार हा सर्व महिला अधिकारी कर्मचारी पाहणार आहेत. मुंबई शहर जिल्हयात ३० मुंबई दक्षिण मध्य आणि ३१ मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदार संघ येत असून येत्या २९ रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रत्येक विधानसभानिहाय एक याप्रमाणे दहा सखी मतदान केंद्र तयार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरता निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार मतदान प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी स्विप (SVEEP) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचे व्यवस्थापन आणि नियोजन असलेले एक ‘सखी मतदान केंद्र’ असणार आहे. सखी मतदान केंद्रावर १- केंद्रप्रमुख ३ किंवा ४ निवडणूक कर्मचारी, १ पोलिस शिपाई अशा पाच ते सहा महिलांचा समावेश असणार आहे. मुंबई शहर जिल्हयात १० विधानसभा मतदार संघ असून २ विधानसभा मतदार संघ मुंबई उपनगर जिल्हयात येतात.

या दहा आणि उपनगरमधील २ अशा १२ सखी मतदान केंद्राची यादी

  • १८२ – वरळी ४७ बी.एम.सी., वरळी सी फेस समुह शाळा, अब्दुल गफार खान मार्ग, मुंबई – ३०
  • १८३ – शिवडी १८६ बी.एम.सी. प्राथमिक मराठी शाळा, तळमजला, मुंबई – ११
  • १८४ – भायखळा २४१ सर अली कादुरी शाळा आणि महाविद्यालय, तळमजला, शिवदास चापशी मार्ग, माझगाव, मुंबई – १०
  • १८५ मलबार हिल १३३ भारत एज्युकेशन सोसायटी, संत गाडगे महाराज वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, तळमजला, खोली क्र.१, (उत्तर दिशा)
  • १८६ -मुबांदेवी २ गिल्डर लेन, बी.एम.सी, शाळा, तळमजला, खोली क्र. २, मुंबई सेंट्रल, मुंबई – ८
  • १८७ कुलाबा १६४ जयहिंद महाविद्यालय, ऐ रोड, चर्चगेट,मुंबई २०
  • १७८ – धारावी १११ भारतरत्न राजीव गांधी स्पोर्टस, कॉप्लेक्स, धारावी बस डेपोजवळ, धारावी
  • १७९ सायन कोळीवाडा ६४ धर्मप्रकाश श्रीनिवास हायस्कुल, तळमजला, स्किम नं-6, रोड नं.26, सायन पश्चिम
  • १८० वडाळा ५१ दोस्ती एकर्स बँन्क्वेट हॉल, शेख मिस्त्री मार्ग, ॲन्टॉप हिल, वडाळा पुर्व, मुंबई – ३७
  • १८१ माहिम १५५ ॲन्टोनियो डिसिल्वा हायस्कुल, नवीन इमारत, तळमजला

मुंबई उपनगर जिल्हयातील दोन सखी मतदान केंद्र

  • १७२ अणुशक्तीनगर १४३ परमाणु ऊर्जा केंद्रीय विद्यालय क्र.१, तळमजला रुम नं – ८
  • १७३ चेंबूर १३८ चेंबूर नाका, महापालिका प्राथमिक शाळा, क्र.१, तळमजला, जुनी इमारत, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई – ७१
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -