घरमहाराष्ट्रबांधकाम साइटवर मजूराने केली आत्महत्या

बांधकाम साइटवर मजूराने केली आत्महत्या

Subscribe

मजूराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिंजवडी परिसरात घडली आहे. लुंगीचा गळफास तयार करून या मजूराने आत्महत्या केली.

मजूराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हिंजवडी जवळील मारूंजी परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. सीमंतो लेट (२२) असे या आत्महत्या केलेल्या मजूराचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.सीमंतो याने आत्महत्याकेल्याची माहिती येथील रहिवाशांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेेऊन मृतदेहाला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर इतर मजूरांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

लुंगीच्या सहाय्याने घेतला गळफास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमंतो हा मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत. त्यांनी मंगळवारी रात्री राहत्या घरात लुंगीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्याचे इतर सहकारी त्यास जेवण करण्यासाठी बोलाविण्याकरिता आले असता आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. सीमंतो यांना पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -