घरमहाराष्ट्रक्षयरोगाच्या आकडेवारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

क्षयरोगाच्या आकडेवारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

Subscribe

२०१६ साली जगभरात ४ लाख २३ हजार नागरिकांचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला होता. भारतामध्ये क्षयरोग ही गंभीर समस्या असून भारताला स्वतंत्र होऊन ७० वर्षांहून अधिक काळ लोटला असूनही एका संसर्गजन्य आजाराचे एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडणे ही खरोखरच वैद्यकीय क्षेत्राची शोकांतिका आहे.

गेली काही शतके संसर्गजन्य आजारांमध्ये रुग्णांची संख्या आणि गंभीर आजारामुळे ओढवलेला मृत्यू यामध्ये कोणता आजार आघाडीवर असेल तर तो म्हणजे क्षयरोग! जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, विश्व टीबी रिपोर्टच्या आधारानुसार जगातील ६४ टक्के टीबी रुग्ण हे भारत, इंडोनेशिया, चीन, फिलिफिन्स, नायजेरिया, पाकिस्तान आणि साऊथ आफ्रीका या सात देशांमध्ये आढळतात आणि यामध्ये भारताचा क्रमांक पहिला आहे. २०१६ साली जगभरात ४ लाख २३ हजार नागरिकांचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला होता. भारतामध्ये क्षयरोग ही गंभीर समस्या असून भारताला स्वतंत्र होऊन ७० वर्षांहून अधिक काळ लोटला असूनही एका संसर्गजन्य आजाराचे एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडणे ही खरोखरच वैद्यकीय क्षेत्राची शोकांतिका आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त क्षयरोगग्रस्त

२०१८ च्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये २ लाख ५४ हजार ७१७ क्षयग्रस्त होते. या राज्यात कानपूर जिल्ह्यात १२ हजार ८६३ क्षयरोगांची संख्या होती. उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र आणि गुजरातचा नंबर लागतो. महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार ११३ तर गुजरातमध्ये १ लाख २३ हजार १०१ क्षयरोगग्रस्त आहेत. या शिवाय छोटी खेडी आणि दुर्गम भागातील क्षयरोगग्रस्तांची संख्या यामध्ये नाही. क्षयरोगाबाबत समाजात आजही मोकळेपणे बोलले जात नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जगात दर मिनिटाला क्षयरोगामुळे एक व्यक्ती दगावते आणि यामध्ये जागतिक स्तरावर भारत देशाने सर्वोच्च प्रमाण नोंदवले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना  ( फुफुसरोग तज्ञ ) डॉ पार्थीव शहा यांनी सांगितलं, ” क्षयरोगाचे जंतू (मायक्रो बॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस) हे अतिसूक्ष्म जंतू असून ते सांसर्गिक (थुंकी बाधित) क्षयरुग्णाच्या श्वसनस्त्रावात असतात. अशा व्यक्तींच्या शिंकण्या-खोकण्या-थुंकण्यातून हे जंतू बाहेर हवेत मिसळतात आणि श्वासावाटे इतर व्यक्तींच्या शरीरात शिरतात. प्रतिकारकशक्ती कमी असल्यास त्वरित किंवा काही कालावधीनंतर क्षयरोग होऊ शकतो. टीबी ( क्षयरोग ) झाला की तो लपवण्याची वृत्ती आजही नागरिकांमध्ये आढळून येते. सार्वजनिक अस्वच्छता, इतस्ततः थुंकणे, दाटीवाटीच्या वस्तीमुळे घरामध्ये सूर्यप्रकाश न येणे, सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था अशा अनेक बाबी क्षयरोगाच्या समस्येस कारणीभूत आहे.
– डॉ. पार्थीव शहा, मुंबईतील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे चेस्ट फीजिशियन
- Advertisement -

मुंबईत सर्वत्र वाढलेली झोपडपट्टी, वाढती अस्वच्छता आणि बकालपणा, गरिबी, अज्ञान, अपुरा आहार, पोषक अन्नाचा अभाव, वैद्यकीय तपासणीपासून वंचित यामुळे गलिच्छ वस्त्या आणि झोपडपट्ट्यांतून क्षयरोगाचे प्रमाण वाढत आहे. एक रोगी अनेक जणांना क्षयरोगबाधित करू शकतो, अशी माहिती खारघरच्या निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित थडानी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -