घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटजगभरात १ अब्ज लोकांना घरातच राहण्याचे आदेश

जगभरात १ अब्ज लोकांना घरातच राहण्याचे आदेश

Subscribe

जगभरातील ५० देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये करोना व्हायरसच्या लढ्याविरोधात तब्बल १ अब्ज लोकांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जगभरातील देशांनी करोना विरोधात लढा पुकारलेला असतानाच आता या महामारीच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरी राहण्यासाठीचे आदेश सरकारला देण्यात आले आहेत. जगभरातील देशांमध्ये फ्रान्स, इटली आणि अर्जेंटिना यासारख्या देशांमध्ये सक्तीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तर इराण आणि ब्रिटनमध्ये मात्र लोकांना घरी राहूनच करोनाचा प्रसार रोखण्यासाठीचा पर्याय देण्यात आला आहे.

भारतातला आकडा ४१५
केंद्र सरकारने देशभरातील बहुतांश भागात रविवारी सायंकाळपासूनच शट डाऊन करण्यासाठी सुरूवात केली होती. देशात आता करोना पॉझिटीव्हचा आकडा हा आता ४१५ वर पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सक्तीने लोकांना घरी राहण्यासाठीच्या मार्गदर्शकांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तर केंद्र सरकारने राज्य सरकारला आदेश देत लॉक डाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर विरोधात कठोर कारवाई आणि दंड करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

संपुर्ण महाराष्ट्रात संचारबंदी

महाराष्ट्रात वारंवार सांगूनही लोकांकडून लॉक डाऊनचे उल्लंघन होत असल्यानेच महाराष्ट्रात संचारबंदी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. राज्याच्या सर्व सीमा आज बंद करण्यात आल्या. तर जिल्ह्याअंतर्गत सीमाही बंद करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आंतरराज्य प्रवासासाठीही आज बंदी जाहीर करण्यात आली. राज्यात सर्व गरजेच्या गोष्टींसाठी मात्र सुरू ठेवण्यात आल्या आहेत. तर राज्यात विविध सेवा पुरवठादार गोष्टींसाठी कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही शहराअंतर्गत सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -