सलाइनमध्ये अळी सापडल्याने खळबळ

उपचारादरम्यान हयगत बाळगल्यामुळे बाळाच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची घटना घडली. दोन वर्षीय मुलाच्या सलाइनमध्ये अळी सापडल्याने आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उचलले जात आहे.

Mumbai
medicines
प्रातिनिधिक फोटो

दोन वर्षांच्या मुलाला सलाइनद्वारे इंजेक्शन देताना बाटलीत अळी आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. उपचारात हयगय केल्याचा ठपका ठेवून रुग्णाच्या नातेवाइकांनी संबंधित डॉक्टर, परिचारिका, औषधी भांडार आणि औषध कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. संबधितांवर जेलरोड पोलिसांत संबंधितांविरोधात गुन्हा करण्यात आला.

कशी घडली घटना

या घटनेनंतर दत्तात्रय चव्हाण (३६) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की त्यांचा मुलगा पृथ्वीराज याला थंडी-ताप आणि सर्दी झाल्याने त्याला ३१ ऑक्टोबर रोजी रात्री रुग्णालयात दाखल केले. ताप जास्त असल्याने डॉक्टरांनी बाल अतिदक्षता विभागात नेण्याची सूचना केली. ३ नोव्हेंबरला सकाळी परिचारिकेने इंजेक्शन आणि औषधे आणण्याची चिठ्ठी दिली. मार्कंडेय औषधी भांडारमधून ती आणून देण्यात आली. सकाळी सलाइनद्वारे औषध देण्यात आले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास पुन्हा १०० मिलिलिटर देण्यासाठी परिचारिका आल्या. त्या वेळी सलाइनच्या बाटलीत कीटक आणि पांढऱ्या रंगाची जाळी आढळून आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here