घरमहाराष्ट्रसुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेल्या ‘त्या’ कुटुंबाचे झाले तरी काय?

सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेल्या ‘त्या’ कुटुंबाचे झाले तरी काय?

Subscribe

दोन महिन्यांनतरही शिंदे कुटुंब बेपत्ता

कर्जबाजारी झाल्याने पिंपरी – चिंचवडमधील एक कुटुंब सुसाईड नोट लिहून दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाले होते.५ डिसेंबर पासून आई-वडील आणि दोन्ही मुले घर सोडून आत्महत्या करतो अस चिठ्ठीत नमूद करून बेपत्ता झाले.संतोष शिंदे,सविता शिंदे असे दाम्पत्याचे तर मुकुंद शिंदे आणि मैथली शिंदे अशी मुलांची नावे आहेत.दोन ते अडीच कोटींचे अंगावर कर्ज असून ते दोन महिन्यानंतर ही बेपत्ता आहेत.त्यांचा ठावठिकाणा लागताना दिसत नाही.पिंपरी पोलीस अद्यापही त्यांचा शोध घेत आहेत.परंतु,त्यांना यश येताना दिसत नाही.

दोन महिन्यात पिंपरी पोलिसांनी नातेवाईक,शेजारी,ओळखीच्या व्यक्तींकडे चौकशी केली. परंतु,अद्यापही ते कुटुंब गेले कुठे असा ठोस पुरावा पोलिसांना मिळालेला नाही.त्यामुळे त्या कुटुंबाचे झाले तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे.संतोष शिंदे यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज होते. काही महिन्यांपासून ते कर्जाचे हप्ते भरू शकत नव्हते. बँकांनी त्यांच्या मागे ससेमिरा सुरू ठेवला होता.त्यामुळे आता बँक मालमत्ता जप्त करणार आहे हे लक्षात येताच शिंदे कुटुंब सुसाईड नोट लिहून बेपत्ता झाले होते.अनेक बँकांकडून त्यांनी कर्ज घेतले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

सुसाईड नोटमध्ये ‘कर्जबाजारीपणाला मी एकटाच जबाबदार असल्याने अन्य कोणाला दोषी धरू नये. मी स्वतःच घर सोडून निघून चाललो आहे. आम्ही चौघे ही आत्महत्या करणार आहोत, हा आमचा सर्वस्वी निर्णय आहे.’’ असे नमूद करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -