करोना व्हायरस : शाओमी पुरविणार एन -९५ मास्क

कंपनी या आठवड्यापासून कर्नाटक, पंजाब, दिल्ली, सरकारी रुग्णालये आणि पोलिसांना एन-९५ मास्क देणार आहे.

Mumbai

शाओमी कंपनीने कोविड – १९ साथीच्या पार्श्वभूमीवर एन-९५ मास्क पुरविण्याची घोषणा केली आहे. कंपनी या आठवड्यापासून कर्नाटक, पंजाब, दिल्ली, सरकारी रुग्णालये आणि पोलिसांना एन-९५ मास्क देणार आहे. तसेच कंपनीकडून डॉक्टरांसाठी हॅझमेट सूट दिले जाणार आहेत, असे मनू कुमार जैन यांनी सांगितले.

व्यापार- प्रवास करणे टाळणे, बाहेरील बैठका रद्द, कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत. याशिवाय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घरातून काम करण्याची मुभा दिली आहे. तसेच कॉर्पोरेट ऑफिस, वेअर हाऊस, सर्व्हिस सेंटर, एमआय होम इत्यादी सुविधा लॉकडाऊनमूळे बंद ठेवल्या आहेत, असेही जैन म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here