घरमुंबईइंजिनिअरिंगचे प्रवेश प्रक्रियेचे नवे वेळापत्रक जाहीर

इंजिनिअरिंगचे प्रवेश प्रक्रियेचे नवे वेळापत्रक जाहीर

Subscribe

तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या गोेंधळामुळे इंजिनिअरिंगचे पुढे ढकलण्यात आलेले प्रवेशाचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले. इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होणार असून, नोंदणी प्रक्रिया व कागदपत्रे 30 जूनपर्यंत जमा करायचे आहेत तर कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती 25 ते 1 जुलैदरम्यान पूर्ण करावी लागणार आहे.

सीईटी सेलकडून घेण्यात येणार्‍या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया रद्द करावी लागली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले होते. परंतु विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन ही प्रवेश प्रक्रिया तंत्र व शिक्षण संचालनालयामार्फत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 24 जूनपासून नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

ही प्रवेश प्रक्रिया तीन फेर्‍यांमध्ये पूर्ण केली जाणार असून, ही प्रक्रिया महिनाभरात आटोपण्यात येणार आहे. अर्ज नोंदणी, निश्चितीची प्रक्रिया झाल्यानंतर २ जुलै रोजी पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. दोन दिवस आक्षेप नोंदणीसाठी असतील. ५ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. ६ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान या फेरी पूर्ण होतील. १ ऑगस्टला शैक्षणिक वर्ष सुरू होईल. कट ऑफ डेट १४ ऑगस्ट असणार आहे.

सेतू केंद्र रद्द, एफसी सेंटर
तालुकानिहाय सुरू केलेले सेतू केंद्र रद्द केले असून, आता प्रवेश प्रक्रिया एफसी केंद्रामार्फत चालणार आहे. एफसी केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेेश पूर्ण केले होते आणि पैसे भरले होते ती यादी संकेतस्थळावर टाकली आहे. त्या विद्यार्थ्यांना पैसे परत केले जाणार आहेत. नव्या प्रक्रियेत पैसे पुन्हा विद्यार्थ्यांना भरावे लागणार आहेत.– डॉ. मानिक गुरसाळ, आयुक्त, सीईटी सेल

- Advertisement -

फार्मसी व आर्किटेक्चरची प्रवेश प्रक्रियाही सुरू
इंजिनिअरिंगप्रमाणे फार्मसी व आर्किटेक्चरची प्रवेश प्रक्रियाही जाहीर करण्यात आली. आर्किटेक्चरची प्रवेश प्रक्रिया 24 जूनपासून तर फार्मसीची प्रवेश प्रक्रिया 25 जूनपासून सुरू करण्यात आली आहे.

अशी असेल प्रक्रिया…
ऑनलाइन अर्ज २४ ते ३० जून
अर्ज निश्चिती २५ जून ते १ जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी २ जुलै
आक्षेप नोंदणीसाठी ३ ते ४ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी ५ जुलै
कॅप राऊंड १मध्ये अभ्यासक्रमाचे विकल्प देणे ६ ते ८ जुलै
पहिली निवड यादी १० जुलै
एआरसीला रिर्पोटिंग ११ ते १४ जुलै
कॉलेजमध्ये प्रवेश निश्चिती १२ ते १५ जुलै
कॅप २ साठी रिक्त जागांची यादी १६ जुलै
अभ्यासक्रमाचे विकल्प देणे १७ ते १८ जुलै
दुसर्‍या फेरीची निवड यादी २० जुलै
एआरसी जाऊन रिर्पोटिंग २१ ते २२
कॉलेजांना जाऊन प्रवेश २२ ते २३ जुलै
कॅप ३ साठी रिक्त जागांची यादी २४ जुलै
अभ्यासक्रम विकल्पासाठी २५ व २६ जुलै
निवड यादी २८ जुलै
एआरसीला रिर्पोटिंग २९ ते ३१ जुलै
कॉलेजला प्रवेश ३० जून ते १ ऑगस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -