घरट्रेंडिंगमुंबई एअरपोर्टवरील रनवे महिनाभर बंद!

मुंबई एअरपोर्टवरील रनवे महिनाभर बंद!

Subscribe

७ फेब्रुवारी (उद्यापासून) ते ३० मार्च या काळात मुंबई एअरपोर्टवरील रनवे दुरुस्तीसाछी बंद राहणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात मुबंई एअरपोर्टवरुन बाहेरगावी जाणाऱ्या तसंच मुंबईमध्ये येणाऱ्या प्रवाशांची काहीशी गाैरसोय होणार
आहे. याचं कारण म्हणजे जवळपास १ महिना मुंबई आंतराष्ट्रीय एअरपोर्टवरील पर्यायी रनवे बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी हा रनवे काही विशिष्ट वेळेत बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या काळात मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करत असलेल्यांना काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, रनवे दुरुस्तीच्या या काळात जवळपास ५ हजार विमानांचे उड्डाण आणि आगमन रद्द केले जाण्याची दाट शक्यता आहे. ७ फेब्रुवारी (उद्यापासून) ते ३० मार्च या काळात मुंबई एअरपोर्टवरील एक रनवे दुरुस्तीसाछी बंद राहील. त्यामुळे मुंबई एअरपोर्टवर दररोज ये-जा करणारी सुमारे २३० विमानं रद्द करण्यात आली आहेत. मुंबई एअरपोर्टवरुन दररोज एका तासाला ३६ विमानं या प्रमाणात विमानांची वाहतूक होत असते.

या वेळेत रनवे राहील बंद :

७ फेब्रुवारी ते ३० मार्च या साधारण महिनाभराच्या कालावधीत केवळ मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशीच रनवे बंद राहणार आहे. या तिनही दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत रनवेच्या दुरुस्तीचे काम केले जाईल. यावेळेत एअरपोर्टवरील मुख्य रनवेवरुन मात्र विमानांची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरु राहील. केवळ पर्यायी रनवेची दुरुस्ती केली जाणार असल्यामुळे त्यावरुन ये-जा करणारी विमानं रद्द करण्यात आली आहेत. मुख्य रनवेवरुन एका तासाला ५० विमानांची वाहतूक होत असते.

जेट एअरवेजवर मोठा परिणाम

उपलब्ध माहितीनुसार, जेट एअरवेज कंपनीच्या विमान वाहतुकीवर याचा प्रामुख्याने परिणाम होणार आहे. सदर रनवेवरुन नियमीत उड्डाण घेणारी जेट एअरवेजची २३ विमानं मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे जेट एअरवेजने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.

या तारखांना वाहतूक बंद

फेब्रुवारी : ६,९,१२,१४,१६,१९,२१,२३,२६,२८
मार्च : २,५,७,९,१२,१४,१६,१९,२१,२३,२६,२८,३०
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -