घरमुंबईक्रिकेटपटूचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

क्रिकेटपटूचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Subscribe

एका उत्कृष्ट क्रिकेटपटूचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

विजेच्या धक्क्याने एका उत्कृष्ट क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राकेश ढोणे असे या क्रिकेपटूचे नाव असून आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. कल्याण येथे राहणाऱ्या राकेशने अनेक स्पर्धा देखील गाजवल्या होत्या. त्याच्या मृत्यूने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

कल्याण पूर्व मलंग रोड नांदिवली परिसरात तलावाजवळ द्वारका सेमी इंग्लिश हायस्कूल आहे. या हायस्कूलमध्ये गुरुवारी बालदिनानिमित्त सकाळी १० च्या सुमारास शाळेच्या गच्चीवर कार्यक्रमाची तयारी सुरू होती. शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होते. दरम्यान, कार्यक्रमाच्या ठिकाणी टेबल ठेवण्यासाठी राकेश ढोणे खाली गेला. त्यावेळी अचानक आवाज आल्याने सर्वांनी तळघराकडे धाव घेतली तेव्हा, राकेश तळघरात असलेल्या पाण्यामध्ये विजेच्या धक्क्याने पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिक्षकांनी तत्काळ राकेशला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तळघरात असलेल्या पाण्यामध्ये विद्युत पुरवठ्याचा धक्का लागल्याने राकेशचा मृत्यू झाल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु केला आहे.


हेही वाचा – Video : …म्हणून सर न्यायाधीशांने भर कोर्टात घेतले बाळाला कडेवर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -