घरमुंबई‘बेस्ट’मध्ये लाखोंची चिल्लर मोजणारी मशीन दाखल

‘बेस्ट’मध्ये लाखोंची चिल्लर मोजणारी मशीन दाखल

Subscribe

कर्मचार्‍यांवरील ताण होणार कमी

‘बेस्ट’ने ऐतिहासकी भाडे कपात केल्यानंतर आता बेस्ट उपक्रमाकडे सुट्या पैशांचा खच पडतो. त्यामुळे बेस्टला लाखो रुपयांची चिल्लर मोजण्याकरता मोठ्या प्रमाणात वेळ खर्च होत असून त्यांची डोकेदुखी वाढली, मात्र आता बेस्टने ‘पारस’ या कंपनीच्या दोन अत्याधुनिक ‘कॉइन ऑपरेटिंग मशीन’ विकत घेतल्या आहेत. पहिली मशीन वडाळा डेपोत दाखल झाली असून त्यामुळे आता बेस्ट कर्मचार्‍यांवर दररोज लाखो रुपयांची चिल्लर मोजण्याकरता जो ताण यायचा, तो कमी होणार आहे.

बेस्टने 9 जुलैपासून दरकपात केल्याने साध्या बसचे किमान तिकीट पाच रुपये,तर एसी बसचे सहा रुपये तिकीट झाल्याने मुंबईकरांनी बेस्टच्या स्वस्त आणि मस्त प्रवासाला भरघोस प्रतिसाद दिला. मात्र बेस्टच्या महसुलात घट झाली असली, तरी प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. जेव्हापासून बेस्टने तिकीट कपातीचा निर्णय अंमलात आणला, तेव्हापासून प्रवासी तिकिटासाठी सुट्टे पैसे देऊ लागले आहेत. यापूर्वी बेस्टकडे दररोज साधारणत: चार लाख रुपयांची नाणी जमा होत असत. आज ही रक्कम जवळपास चारपटीने वाढून १२ लाखांच्या घरात पोहोचली आहे.

- Advertisement -

यामध्ये एक, पाच आणि दहा रुपयांच्या सर्वाधिक नाण्यांचा समावेश आहे. सध्या कंडक्टरकडून मोठ्या प्रमाणात येणार्‍या सुट्ट्या पैशांच्या मोजणीसाठी बेस्टच्या डेपोमध्ये कर्मचार्‍यांचा मोठ्या प्रमाणात वेळ खर्च होत आहे, परंतु यावर उपाय म्हणून बेस्टने ‘पारस’ या कंपनीचे दोन अत्याधुनिक ‘कॉइन ऑपरेटिंग मशीन’ प्रायोगिकतत्वावर विकत घेण्यात आली आहे. या दोन मशीनपैकी एक वडाळा डेपोत तर दुसरी कुलाबा डेपोला देण्यात आली आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व डेपोंमध्ये या मशिनी लावण्यात येणार आहेत.

अशी आहे ‘कॉइन ऑपरेटिंग मशीन’
प्रत्येक मशीनची किंमत ६० हजार रुपये आहे. या ‘कॉइन ऑपरेटिंग मशीन’मध्ये एक, दोन, पाच आणि दहा रुपयांची सर्व नाणी मोजली जातात. सोबतच या मशिनीमध्ये एकत्रिक नाणी टाकल्यानंतर या नाणींची अचूक विभागणी करून त्यांची माहिती मशिनद्वारे स्क्रीनवर दाखवली जाते. सोबतच त्याची प्रिंट सुद्धा काढता येते. या मशीनला नाणी मोजण्याकरता कमीत कमी एक मिनिट किंवा जास्तीत जास्त दोन मिनिटांचा कालावधी लागतो.

- Advertisement -

भाडे कपातीमुळे पूर्वीपेक्षा चार पट्टीने जास्त सुट्टे पैसे बेस्टकडे जमतात. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने प्रायोगिकतत्वावर दोन अत्याधुनिक ‘कॉइन ऑपरेटिंग मशीन’ घेतल्या आहेत. त्यामुळे आता बेस्ट कर्मचार्‍यांवर येणार ताण कमी होणार आहे.
– सुनील गणाचार्य, वरिष्ठ बेस्ट समिती सदस्य

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -