घरमुंबईभिवंडीकर निवडणूक ओळख पत्रापासून वंचित

भिवंडीकर निवडणूक ओळख पत्रापासून वंचित

Subscribe

भिवंडी लोकसभा मतदार संघातील बहुसंख्य मतदारांना मतदानाच्या स्लिप आणि निवडणूक ओळख पत्र न मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बहुतांशी मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात. अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते शरद भसाळे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघात सुरु असलेला प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. येत्या २९ एप्रिल रोजी या मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना निवडणुकीची कामे वाटप करण्यात आली आहेत. निवडणूक मतदानाच्या दृष्टीकोनातून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांपर्यंत त्यांचे निवडणूक ओळख पत्र आणि मतदानाच्या स्लिप पोहचविण्याची जबाबदारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ ) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र अद्याप भिवंडी लोकसभा मतदार संघातील बहुसंख्य मतदारांना अद्याप मतदानाच्या स्लिपा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे बहुतांशी मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात. अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते शरद भसाळे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

मतदार मतदान स्लिप पासून वंचित

भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण अशा तीन विधानसभा मतदार संघात सुमारे ९०० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी २५ एप्रिलपर्यंत विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदारांपर्यंत निवडणूक ओळख पत्र आणि मतदानाच्या वेळी लागणाऱ्या छापील नावाच्या स्लिप पोहचविण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. मात्र मतदारांना अद्याप रंगीत ओळख पत्र आणि मतदानाच्या स्लिप मिळालेल्या नाहीत. त्यामुळे मतदारांना मतदान करताना तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मताची टक्केवारी सुद्धा घसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

२३ – भिवंडी विधानसभा क्षेत्रात मतदारांना ओळख पत्र आणि मतदान स्लिप वाटप करण्याची जबाबदारी केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मतदारांना रंगीत निवडणूक ओळख पत्र आणि छापील मतदारांची नावे असलेल्या स्लिप देण्यासाठी प्रयत्नशील आहे.  – किशन जावळे, २३ – भिवंडी लोकसभा मतदार संघ, निवडणूक निर्णय अधिकारी


वाचा – मतदानाचा टक्का वाढावण्यासाठी भिवंडीत अनोखी शक्कल

- Advertisement -

वाचा – कल्याण, भिवंडीत रंगलय आगरी- कुणबी मतांचे राजकारण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -