घरमुंबईमहाशिवआघाडीची बैठक संपली, सत्तास्थापनेचा 'ड्राफ्ट' तयार!

महाशिवआघाडीची बैठक संपली, सत्तास्थापनेचा ‘ड्राफ्ट’ तयार!

Subscribe

‘काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये झालेली बैठक आता संपली आहे. त्यामध्ये सर्व नेत्यांच्या सहमतीने सत्तास्थापनेसंदर्भातला ड्राफ्ट बनवण्यात आला आहे. आता हा ड्राफ्ट काँग्रेसचे दिल्लीतील हायकमांड आणि शरद पवार यांना पाठवण्यता येणार आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमसंदर्भात चर्चा होऊन त्याला या ड्राफ्टमध्ये अंतिम स्वरूप देण्यात आलं आहे’, अशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक मुंबईत झाल्यानंतर त्यांनी पत्रकारंशी संवाद साधला. यावेळी, महाराष्ट्रात पुढे सत्तास्थापनेसंदर्भात कशी कार्यवाही होईल, त्याबाबत त्यांनी माहिती दिली.

‘हायकमांड ड्राफ्टबाबत निर्णय घेतील’

‘महाराष्ट्रात लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हावी ही सगळ्यांची इच्छा आहे. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शरद पवार आणि आमच्या हायकमांडनी या सत्तास्थापनेसंदर्भातल्या ड्राफ्टबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला, तर सरकार स्थापनेत अडथळा येणार नाही’, असं विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. दरम्यान, जोपर्यंत तिन्ही पक्षांमधले ज्येष्ठ नेते यावर शिक्कामोर्तब करत नाही, तोपर्यंत यातले मुद्दे जाहीर केले जाणार नाहीत, असं देखील वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

- Advertisement -

हेही वाचा – बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला शरद पवार-सोनिया गांधी भेट ठरली!

पवार-सोनिया भेटीत शिक्कामोर्तब होणार?

दरम्यान, येत्या २ दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीला जाऊन काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीमध्येच राज्यातल्या महाशिवआघाडीचा ड्राफ्ट चर्चेला येऊन त्यावर शिक्कामोर्तब येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर १७ नोव्हेंबरला म्हणजेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांना मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीस्थळी जमण्याचे आदेश दिल्याचा संदर्भ जोडला जात आहे. त्याच दिवशी राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -