घरमुंबईराष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

Subscribe

अंबरनाथ येथील तहसील कार्यालयावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा बेरोजगारांच्या फसव्या धोरणांचा निषेध करण्यासाठी अंबरनाथ येथे राष्ट्रवादीचा धडक मोर्चा काढण्यात आला.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा बेरोजगारांच्या फसव्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील तसेच युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ शहर, अंबरनाथ ग्रामीण आणि बदलापूर शहरातील युवक – युवतींचा अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा अंबरनाथ पूर्वेकडील हुतात्मा चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत काढला गेला. तहसीलदार जयराज देशमुख यांना तेथे जाऊन निवेदनदेखील देण्यात आले.

अनेक पदाधिकारी उपस्थित

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, प्रदेश सचिव आशिष दामले, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष पुष्पराज गायकवाड, युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत वानखेडे, कार्याध्यक्ष बळीराम साबे, उपाध्यक्ष विनोद शेलार, महिला शहराध्यक्ष पूनम शेलार, युवती अध्यक्ष ऐश्वर्या मोटे, प्रिसीला डिसेल्वा, कलाताई म्हेत्रे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनील अहिरे, प्रफुल थोरात, बदलापूर शहराध्यक्ष कालिदास देशमुख, अंबरनाथ ग्रामीण अध्यक्ष काशीनाथ पाटील, प्रवीण खरात, बदलापूर महिला शहराध्यक्ष अनघा वारंग, अनिता नवले, अनिशा खान यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

जनआंदोलनाचा इशारा

केंद्र तसेच राज्य सरकारने २.५ कोटी युवक-युवतींना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, जे ते पूर्ण करू शकले नाहीत. म्हणून सरकारवर ४२० भा.द.वी प्रमाणे गुन्हा दाखल करावा, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात युवक-युवतींची भरती करावी, प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक महाविद्यालयात ओबीसी, एससी, एसटी, एनटी, विजेएनटी विद्यार्थ्यांची बंद केलेली शिष्यवृत्ती तात्काळ चालू करावी, महाराष्ट्रात २४ हजार शिक्षकांची थांबलेली भरती तात्काळ करण्यात यावी आणि शासनाने लालफित शाहित अडकवून ठेवलेल्या मेडिकल कॉलेज आणि महाविद्यालयाला तात्काळ परवानगी देण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या राष्ट्रवादीच्यावतीने लेखी निवेदन देऊन करण्यात आल्या आहेत. आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा अन्यथा लोकशाही मार्गाने मोठे जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -