घरताज्या घडामोडीलाचारीचा तिटकारा आलाय? मनसे नेत्याची शिवसैनिकांना साद

लाचारीचा तिटकारा आलाय? मनसे नेत्याची शिवसैनिकांना साद

Subscribe

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्षाचे महाअधिवेशन घेतले जात आहे. या अधिवेशनाची वेळ जसजशी जवळ येतेय, तसे मनसेकडून रोज नवीन खेळी खेळल्या जात आहेत. दोन दिवसांपुर्वीच दादर येथे भगव्य रंगात बॅनरबाजी करुन राज ठाकरेंना मराठी हृदयसम्राट अशी उपाधी दिली गेली होती. तर आता शिवसेनेच्या हाडाच्या कार्यकर्त्यांना साद घालण्यात येत आहे. मनसे हिंदुत्वाचा पुरस्कार करणार अशी बातमी आल्यानंतर मनसे सोडून गेलेले नेते देखील कृष्णकुंजवर दाखल झाले होते. आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करुन “शिवसेनेतील लाचारीचा तिटकारा आला असल्यास राज साहेबांचे नेतृत्व स्वीकारायला हवे” असे आवाहन केले आहे.

- Advertisement -

संदीप देशपांडे ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, “ज्यांना लाचारीचा तिटकारा आहे आणि महाराष्ट्र धर्माचा अभिमान आहे त्यांनी राज साहेबांचे नेतृत्व स्वीकारायला हवे… | | मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा ||” या ट्विटच्या माध्यमातून कडव्या शिवसैनिकांना साद घालण्यात आलेली आहे.

मनसेने २३ जानेवारीच्या अधिवेशनाची जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वीच आगामी काळात भाजपसोबत युती होऊ शकते, असे संकेत दिले होते. त्यानंतर मनसेच्या अधिवेशनाची जोरदार चर्चा सुरु झाली होती. याच कार्यक्रमात राज ठाकरे मनसेची नवी दिशा जाहीर करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -