घरमुंबईशाळेच्या इमारतीवरून उडी मारुन विद्यार्थीनीची आत्महत्या

शाळेच्या इमारतीवरून उडी मारुन विद्यार्थीनीची आत्महत्या

Subscribe

भिवंडी शहरातील नागाव सलामतपुरा परिसरात असलेल्या अन्सारी साफिया गर्ल्स ऊर्दु हायस्कूलमध्ये दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीने चाचणी परीक्षा संपल्यानंतर शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. जबर जखमी झालेल्या 14 वर्षाच्या मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख या विद्यार्थीनीला मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच रस्त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेविषयी पोलीस तपास करत आहेत.

भिवंडी शहरातील फातमा नगर येथे राहणारी मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख ही अन्सारी साफिया गर्ल्स उर्दू हायस्कूल मध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती. शाळेत सध्या चाचणी परीक्षा सुरू होती. बुधवारी इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा पेपर होता. सकाळी साडेसात वाजता मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख ही शाळेत आली. त्यानंतर पहिल्या मजल्या वरील वर्ग खोलीत परीक्षेसाठी बसली. साडे नऊ वाजता पेपर सुटल्यावर ती पहिल्या मजल्यावरुन शाळेच्या पाचव्या मजल्यावर गेली, त्यानंतर गॅलरीतून तिने खाली मारली.

- Advertisement -

शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तिला वंजारपट्टी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु या ठिकाणी तिला सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर तिला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे प्रथमोपचार करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी जे जे हॉस्पीटलमध्ये नेले जात असताना वाटेत तिचा मृत्यू झाला. आत्महत्येची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -