घरमुंबईअकरावीच्या दुसर्‍या विशेष फेरीसाठी १ लाख ७ हजार जागा

अकरावीच्या दुसर्‍या विशेष फेरीसाठी १ लाख ७ हजार जागा

Subscribe

अकरावीच्या तीन फेर्‍या आणि एक विशेष फेरी होऊनही तब्बल १ लाख ७ हजार ३६ इतक्या जागा रिक्त राहिल्या आहेत. त्याचबरोबर सुमारे २५ हजार विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून दूर आहेत.

अकरावीच्या तीन फेर्‍या आणि एक विशेष फेरी होऊनही तब्बल १ लाख ७ हजार ३६ इतक्या जागा रिक्त राहिल्या आहेत. त्याचबरोबर सुमारे २५ हजार विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून दूर आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी आणि दहावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही नव्याने अर्ज करण्याची संधी मिळावी यासाठी आता दुसरी विशेष फेरी राबवण्यात येणशर आहे. दुसर्‍या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ५ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता दुसर्‍या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी यंदा असलेल्या ३ लाख २० हजार ३९० जागांसाठी २ लाख १२ हजार १५२ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरी अखेर अर्ज दाखल केले होते. यानंतर तीन नियमित फेरी आणि त्यानंतर एक विशेष फेरी आणि कोट्यातील प्रवेश ४३ हजार ७२३ असे मिळून आतापर्यंत १ लाख ८२ हजार १४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामुळे तब्बल १ लाख ७ हजार ३६ जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांवर आणि प्रवेशापासून अद्यापही वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी दुसरी विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. या फेरीला १ जानेवारीपासूनच प्रारंभ झाला आहे. या फेरीत आता पुरवणी परीक्षेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांना ४ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर ५ जानेवारी रोजी ६ वाजता यादी जाहीर होणार आहे अशी माहिती शिक्षण संचालकांनी दिली आहे. दुसर्‍या विशेष फेरी दरम्यान विद्यार्थ्यांना द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थी पसंतीनुसार महाविद्यालयात अर्ज करू शकणार आहेत. ५ जानेवारीला दुसर्‍या विशेष फेरीची गुणवत्ता यादी प्रदर्शित करताना महाविद्यालयांना द्विलक्षी विषयासाठी आलेल्या अर्जानुसार निवड यादी तयार करून प्रसिद्ध करायची सूचना शिक्षण संचालनालयाने दिली आहे. ६ ते ८ जानेवारीदरम्यान दुसर्‍या विशेष दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -