घरमुंबईमुंबईत १ हजार ६१३ नवजात बालकांचा मृत्यू

मुंबईत १ हजार ६१३ नवजात बालकांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत २०१९ च्या फेब्रुवारीपर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे १ हजार ६१३ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब एका माहिती अधिकारातून समोर आली आहे.

राज्य सरकारकडून बालमृत्यू रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही, बालमृत्यूचं प्रमाण कमी होत नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. जन्माला आल्यावर अवघ्या चोवीस तासांत मृत्यूमुखी पडणाऱ्या नवजात बालकांचा मृत्यूदर देशातही सर्वाधिक आहे. मुंबईत २०१९ च्या फेब्रुवारीपर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे १ हजार ६१३ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब एका माहिती अधिकारातून समोर आली आहे. ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम’ (एचएमआयएस)ने दिलेल्या आकडेवाडीनुसार ही माहिती समोर आली आहे.

४०० नवजात बालकांचा मृत्यू

अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पण, अनेकदा रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक अर्भकांचा अतिदक्षता विभागात संसर्गामुळे मृत्यू होतो. मुंबईत दर महिन्याला सरासरी ४०० नवजात बालकांचा मृत्यू होतो. मुदतपूर्व प्रसूती झाल्यामुळे, जन्मतः संसर्ग झाल्याने, व्यंग असल्याने या जन्मजात बाळांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो. अशा परिस्थितीत सर्वात जास्त नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागांची गरज वाढते.

- Advertisement -

संसर्गामुळे बाळांचा मृत्यू

तर, राज्यातील अहमदनगरमध्ये फेब्रुवारीपर्यंत ६४८ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम’ (एचएमआयएस)ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत २०१९ च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत २४ तासांत ४४९ नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर, जन्माच्या चार आठवड्यांच्या ४०७ नवजात बालकांचा मृत्यू झाला. अशा अनेक कारणांमुळे आतापर्यंत १ हजार ६१३ बालकांचा मृत्यू झाला असल्याचं चेतन कोठारी यांनी सांगितलं. तसंच, १ ते ५ वयोगटातील १५५ मुलांचा मृत्यू झाल्याचं ही या माहिती अधिकारात म्हटलं आहे. न्यूमोनिया, ताप, डायरिया, गोवर आणि सर्वात जास्त मृत्यू हे संसर्गामुळे होत असल्याचंही या माहिती अधिकारात म्हटलं आहे.

मृत्यू होण्याची प्रमुख कारणे

मुदत पूर्व प्रसूती, गर्भातच गुदमरुन मृत्यू होणे, संसर्गामुळे मृत्यू शेवटी आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जन्मजात अवयवांची वाढ न होणे, या चार महत्त्वाच्या कारणांमुळे अर्भकांचा मृत्यू होऊ शकतो, असं तज्ज्ञ डॉक्टर्स सांगतात.

- Advertisement -

हेही वाचा – 

बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी ‘मिशन मेळघाट’

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -