घरमुंबईमोनोरेलच्या ताफ्यात १० आणखी ट्रेन

मोनोरेलच्या ताफ्यात १० आणखी ट्रेन

Subscribe

सध्याच्या मोनोरेलच्या वेळापत्रक चुकणार्‍या फेर्‍या येत्या दिवसांमध्ये आणखी वक्तशीर होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून मोनोरेलच्या ताफ्यात आणखी नवीन १० ट्रेन खरेदीच्या प्रक्रियेसाठी आता एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. मोनोच्या सध्याच्या ताफ्यात आणखी ३ ट्रेन दुरूस्त करून प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील आहे.

मोनोरेलच्या भंगारातील दोन ट्रेनचे स्पेअर पार्ट वापरून आणखी तीन ट्रेन येत्या दिवसात मोनोरेलच्या ऑपरेशनमध्ये येणार आहेत. त्यामुळे सध्याची वीस ते पंचवीस मिनिटांची मोनोरेलची प्रतिक्षा आणखी कमी होणार आहे. या तीन मोनोच्या ट्रेन ताफ्यात आल्यानंतर एकुण ट्रेनची संख्या ७ होणार आहे. त्याचा फायदा हा दोन ट्रेनमधील वेळ कमी होण्यासाठी होईल. सध्या स्पेअर पार्ट उपलब्ध व्हावेत म्हणून निविदा प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या दिवसांमध्ये काही स्पेअर पार्ट उपलब्ध होतील. याचा फायदा हा मोनोरेल दुरूस्त करून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी होणार आहे.

- Advertisement -

नव्या १० ट्रेन खरेदी करण्यासाठीही एमएमआरडीए निविदा प्रक्रिया राबवत आहे. ही निविदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसारच येत्या काही वर्षात टप्प्याटप्प्याने या ट्रेन उपलब्ध होतील. या सर्व नव्या १० ट्रेन ऑपरेशनमध्ये येण्यासाठी साधारण दीड ते दोन वर्षे इतका कालावधी लागेल अशी माहिती एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. सध्या मोनोरेलचा प्रवास करणार्‍यांची सरासरी संख्या ही २५ हजार इतकी आहे.

मोनोरेलच्या फ्रिक्वेन्सीचा प्रश्न सुटला नसल्याने अजुनही म्हणावा तितका प्रतिसाद मोनोरेलच्या प्रवासासाठी मिळालेला नाही. मोनोरेलकडून तिकिटात लवलत दिल्यास ही संख्या आणखी वाढू शकते अशी सर्वसामान्य प्रवाशांची प्रतिक्रिया आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -