खुशखबर! मुंबईतील १० टक्के पाणीकपात पुढे ढकलली

मुंबईतील ३ ते ९ डिसेंबरला जाहीर झालेली पाणीकपात आता ७ ते १३ डिसेंबरला करण्यात येणार आहे.

Mumbai
10 percent water cut postponed in mumbai
खुशखबर! मुंबईतील १० टक्के पाणीकपात पुढे ढकलली

मुंबईत पिसे येथील पंपिंग स्टेशनच्या कामांसाठी ३ ते ९ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेली १० टक्के पाणीकपात आता पुढे ढकलण्यात आली आहे. ही पाणीकपात आता शनिवारी ७ ते १३ डिसेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना किमान चार दिवस बिनधास्त पाण्याचा वापर करता येणार असला तरी पुढील आठवडयात या पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.

दुरुस्तीचे काम चार दिवस पुढे ढकलले

पिसे उदंचन केंद्रात न्यूमॅटिक गेट सिस्टिमची दुरुस्तीचे काम मंगळवारी ३ डिसेंबरपासून हाती घेण्यात येणार होते. त्यामुळे हे काम ९ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यामुळे संपूर्ण मुंबईत मंगळवार, ३ ते सोमवार ९ डिसेंबर २०१९ या कालावधीत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार होती. परंतु या दुरुस्तीचे काम चार दिवस पुढे ढकलले आहे. आता हे काम शनिवारी ७ ते शुक्रवारी १३ डिसेंबर या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत ३ ते ९ डिसेंबर २०१९ याऐवजी आता शनिवार ७ ते शुक्रवार १३ डिसेंबर २०१९ या कालावधीत १० टक्के पाणीकपात होणार आहे.

एक दिवस आधी पुरेसे पाणी साठवून ठेवावे

पाणीकपातीच्या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा देखील होऊ शकतो. तथापि, दुरुस्ती कामाची आवश्यकता लक्षात घेता, नागरिकांनी कपात कालावधीत सहकार्य करावे तसेच एक दिवस आधी पुरेसे पाणी साठवून ठेवावे असे आवाहन महापालिका जलअभियंता विभागाने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here