वरळी कोळीवाड्यात १२ पॉझिटिव्ह रुग्ण; १०८ जण पोद्दारमधील क्वॉरंटाईनमध्ये

वरळी कोळीवाड्यात १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या १०८ जणांना वरळीच्या पोद्दार रुग्णालयात क्वॉरंटाईन कक्षात ठेवण्यात आाले आहे.

Mumbai
108 people quarantined in Worli Poddar Hospital
पोद्दार रुग्णालय

वरळी कोळीवड्यात कोरोनाचे १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने कोळीवाड्याचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आाला आहे. मात्र, या १२ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सुमारे १०८ जणांना पोद्दार रुग्णालयातील अलगीकरण कक्षात अर्थात क्वॉरंटाईन कक्षात ठेवण्यात आाले आहे.

संशयित १०८ जण पोद्दारमधील क्वॉरंटाईनमध्ये

वरळी कोळीवाडा परिसरातील रुग्ण करोनाबाधित आढळून आल्यानंतर त्यांच्या जवळच्या लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत १२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे या सर्वांच्या संपर्कात आलेल्यांची यादी महापालिका आणि पोलीस यांनी संयुक्तपणे अशी एकूण १०८ जणांची यादी तयार करून त्यांना क्वॉरंटाईन कक्षात रवानगी करण्याचा निर्णय घेतला. यासर्वांना सकाळी १० वाजता नेण्यासाठी कार्यवाही करण्यात आली होती. परंतु, रहिवाशी जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याची समजूत काढल्यानंतर दुपारी दीड वाजता बेस्टच्या एका बसमधून यासर्वांना नजिकच्याच पोद्दार रुग्णालयात नेले आहे. तरीही अजून काही रहिवाशी जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे यासर्वांना टप्प्याटप्प्याने बसमधून पोद्दारमध्ये नेले जात आहे. पोलीस आणि महापालिकेचे अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढत त्यांचे मन वळवले आहे. पोद्दार रुग्णालयात बनवण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात त्यांना ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. कोळीवाड्यासह आता नजिकच्या झोपडपट्टीत रुग्ण करोना पॉझिटिव्ह आल्याने कोळीवाडा झोपडपट्टीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आाल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत कोळीवाड्यातील १२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून समजते.


हेही वाचा – ‘हज’ यात्रेसाठी येताय; पण जरा थांबा, कारण…