Corona Update: मुंबईत २४ तासांत १,१२५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ, ४२ जणांचा मृत्यू!

मुंबई गेल्या २४ तासांत १ हजार १२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनोबाधितांची संख्या १ लाख १९ हजार २५५वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ६ हजार ५८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत मुंबईत ७११ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत ९१ हजार ६७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

 

आज दिवसभरात मुंबईत ६७१ संशयीत रुग्ण भरती झाले असून आतापर्यंत संशयीत रुग्ण भरती झालेली संख्या ८४ हजार ६४४वर पोहोचली आहे. तसेच सध्या मुंबईत २० हजार ६९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज झालेल्या ४२ रुग्णांचा पैकी ३० रुग्ण पुरुष आणि १२ रुग्ण महिला होत्या. यापैकी ३१ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच २४ रुग्णांचे वय ६० वर्षा वर होते. तर उर्वरित १८ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. ४ ऑगस्टपर्यंत ५ लाख ६७ हजार ३१ कोविड चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत दुप्पटीचा दर ८० दिवस आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात १०,३०९ नव्या रुग्णांची नोंद, ३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!