घरमुंबईमुंबईतून ११६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

मुंबईतून ११६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Subscribe

९ उमेदवारांची निवडणुकीतून माघार

लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईती शहर आणि उपनगर मिळून एकूण सहा मतदारसंघांतून आता ११६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार असणार आहेत. दिवसअखेर एकूण ९ उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर इतके अर्ज अवैध ठरले.

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून वारिस अली नसीर अहमद फारुकी व अब्बू देवेंद्र (आरुमुगम एम.देवेंद्र) या दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघातून उत्तमचंद राजमल जैन व मो. नईम शेख या दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात 17 तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवार आहेत. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक ती तयारी प्रशासन स्तरावर करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबई शहरात 31 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्द झालेली यादीनुसार 24 लाख 56 हजार 497 मतदार होते. त्यात 42 हजार 437 नव्याने भर पडली. तसेच 215 अनिवासी भारतीयांची (NRI) नावे नोंदली गेली असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

मुंबई उपनगरातून आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत ५ उमेदवारांनी माघार घेतली. मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांत एकूण ८६ उमेदवार आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. आजच्या अंतिमदिवसापर्यंत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून राकेश विश्वनाथ अरोरा यांनी माघार घेतली. मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून ज्योती सुरेश शेट्टी यांनी माघार घेतली. मुंबई उत्तर-पूर्व (ईशान्य) लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र वामन वाघमारे यांनी माघार घेतली, तर मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून राकेश अरोरा व मुइनुद्दीन यार मोहम्मद खान या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

नवमतदारांसाठी माय फर्स्ट व्होट सेल्फी
मतदानाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज असून प्रत्येक नागरिकाने मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवावा. नवमतदारांसाठी माय फर्स्ट व्होट सेल्फी हा अभिनव उपक्रम राबवित असल्याचे शिवाजी जोंधळे म्हणाले. पहिल्यांदा मतदान केल्यानंतर आपला सेल्फी शेअर करावा. सर्वोत्कृष्ट सेल्फीला पारितोषिक देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

मतदारांसाठी जनजागृती
स्वयंसेवी संस्थाकडून जनजागृतीकरीता पथनाट्य करण्यात येत आहेत. आयपीएल सामन्यादरम्यान युवा मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी स्टॅन्डी, होर्डीग्स लावण्यात येत आहेत. सी-व्हीजील अ‍ॅपच्या माध्यमातून आतापर्यंत जागरुक नागरिकांनी मुंबई उपनगरातून 83 तक्रारी दाखल केला असून 82 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. भरारी पथक तसेच तक्रार प्राप्त झाल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत जवळपास 9.36 कोटी रक्कम संशयीत म्हणून पकडली गेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -