घरमुंबईमुंबईत आज कोरोनाचे १,१७४ नवे रुग्ण, तर ४७ जणांचा मृत्यू

मुंबईत आज कोरोनाचे १,१७४ नवे रुग्ण, तर ४७ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईतून तब्बल ६५ हजार ६२२ जणांना मिळाला डिस्चार्ज

मुंबईमध्ये १ हजार १७४ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९३ हजार ८९४ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५३३२ वर पोहचला आहे.

मुंबईमध्ये आज १ हजार १७४ नवे रुग्ण सापडले असून ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३७ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३१ पुरुष तर १६ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ६ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २८ जण हे ६० वर्षांवरील, तर १३ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. ४७ मृत्यू हे गत ४८ तासांमधील आहेत.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचे ९३४ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ६५ हजार ५५० वर पोहचली आहे. तसेच ७५० रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ६५ हजार ६२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.


Corona Update: राज्यात २४ तासांत ६,४९७ नव्या रूग्णांची नोंद; १९३ जणांचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -