घरमुंबईदीड वर्षीय लहानग्याच्या अपहरणप्रकरणी १३ वर्षांच्या मुलाला अटक

दीड वर्षीय लहानग्याच्या अपहरणप्रकरणी १३ वर्षांच्या मुलाला अटक

Subscribe

दादर येथून अपहरण करण्यात आलेल्या दीड वर्षाच्या मुलाला शोधून काढण्यात शिवाजी पार्क पोलिसांना यश आले आहे. दीड वर्षाचा मुलगा सुखरूप मिळून आला असून या प्रकरणी पोलिसांनी १३ वर्षाच्या मुलाला या गुन्हयात अटक करून त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. ट्रेनमध्ये भीक मागण्यासाठी अपहरण करण्यात आलेल्या मुलाचा वापर करण्यात आला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

दादर पश्चिम येथील भाजी मार्केटमध्ये फळ विकणार्‍या एका महिलेचे दीड वर्षाचे मुलं हरवल्याची तक्रार तिने गेल्या आठवड्यात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दिली. शिवाजी पार्क पोलिसांनी दादर परिसरातील तसेच रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासले असता एक अल्पवयीन मुलगा दीड वर्षाच्या मुलाला घेऊन जात असताना पोलिसाना दिसून आला.

- Advertisement -

पोलिसांनी या मुलाचा शोध घेण्यासाठी रेल्वे मार्गावरील दादर ते ठाणे रेल्वे स्थानक परिसर पिंजून काढला. मात्र, अपहरण कऱण्यात आलेल्या मुलाचा काही थांगपत्ता लागत नसल्यामुळे पोलिसांची चिंता वाढली होती. दरम्यान, कळवा पोलीस ठाण्यात एक ते दीड वर्षाचा मुलगा मिळून आल्याची माहिती शिवाजी पार्क पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी कळवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. कळवा पोलिसांना मिळून आलेला मुलगा हा दादर येथून अपहरण कऱण्यात आलेला मुलगाच असल्याची खात्री पटवण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणार्‍या १३ वर्षाच्या मुलाला नवीमुंबईतील घणसोली येथून ताब्यात घेतले. या मुलाच्या चौकशीत त्याने स्वतःसोबत खेळण्यासाठी दीड वर्षाच्या मुलाला घेऊन गेलो होतो, अशी माहिती त्याने पोलिसाना दिली. या १३ वर्षाच्या मुलाने दीड वारशाच्या मुलाला ट्रेनने ठाणे येथे घेऊन गेला तेथून तो घरी घणसोली येथे आला, मात्र आई ओरडल्यामुळे तो मुलाला घेऊन परत ठाणे येथे आला तेथून तो कळवा मफतलाल कंपनी येथील त्या मुलाला एका झाडाखाली सोडून निघून गेला होता. त्यानंतर एका दहा वर्षाच्या मुलाने त्या मुलाला आपल्या घरी घेऊन गेला मात्र त्या मुलाच्या आईने या दिड वर्षाच्या मुलाला कळवा पोलिसांच्या हवाली केले होते.

- Advertisement -

या सर्व प्रवासात या दीड वर्षाच्या चिमुरड्याचे उपाशीपोटी २४ तास फरफट झाली होती. दरम्यान शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १३ वर्षाच्या मुलाची बालसुधारगृहात रवानगी कऱण्यात आली आहे. १३ वर्षाचा हा मुलगा ट्रेनमध्ये भीक मागण्याचे काम करतो, अपहरण कऱण्यात आलेल्या मुलाचा वापर त्याने भीक मागण्यासाठी केला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली असून य प्रकरणी तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -