Corona In Mumbai: मुंबईत आढळले १,३४६ नवे रुग्ण, ४२ जणांचा मृत्यू!

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३४६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

1346 new corona patient found and 42 deaths in mumbai today
Corona In Mumbai: मुंबईत आढळले १,३४६ नवे रुग्ण, ४२ जणांचा मृत्यू!

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३४६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५८ हजार ७५६ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ७ हजार ९३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासांत ८८७ रुग्ण बरे झाले असून एकूण १ लाख २५ हजार ९०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

आज झालेल्या मृतांपैकी ४२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच २८ रुग्ण पुरुष आणि १४ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १५ जणांचे वय ४० ते ६० मधील होते. तर २७ जणांचे वय ६० वर्षावर होते.

मुंबईतील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच ७ सप्टेंबरपर्यंत ८ लाख ४३ हजार ६९१ कोविडच्या एकूण चाचण्या झाल्या आहेत. तर मुंबईतील दुप्पटीचा दर ६५ दिवसांचा आहे.


हेही वाचा – Corona In Maharashtra: आज २०,१३१ नव्या रूग्णांचे निदान; तर Recovery Rate ७१ टक्के