घरमुंबईआता राज्यभर सरकारी रुग्णालयात लागणार 1360 सीसीटीव्ही

आता राज्यभर सरकारी रुग्णालयात लागणार 1360 सीसीटीव्ही

Subscribe

डॉक्टरवर होणारे हल्ले, मुल चोरीला जाणे, यांसह रुग्णालयात घडणार्‍या दुर्घटना रोखण्यासाठी राज्यभरातील सरकारी रुग्णालयात सीसीटीव्हीची नजर असणार आहे. ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय तसेच महिला आणि जिल्हा रुग्णालयात एकूण 1360 सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय सरकारच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी 4 कोटी 2 लाख रुपये यासाठी खर्च करण्यात येणार आहेत.

राज्यातील एकूण 498 रुग्णालयांत सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, यासाठी सरकारच्या आरोग्य विभागाने मंजुरी देखील मिळवली आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सरकारने याचा जीआर देखील काढला आहे. या सीसीटीव्ही कॅमेराची नजर रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावर, ओपीडी, छोट्या मुलांच्या कक्षात, ऑपरेशन थिएटरच्या परिसरात, कर्मचार्‍यांच्या रूममध्ये असणार आहे.

- Advertisement -

असा होणार खर्च –
498 रुग्णालयात एकूण 1360 सीसीटीव्ही लागणार असून, यासाठी एकूण 4 कोटी 2 लाख रुपये इतका खर्च येणार आहे. यामध्ये 266 सीसीटीव्हीची सिस्टीम खरेदी करण्यासाठी 2 कोटी 66 लाख रुपये आणि 1360कॅमेरे खरेदी करण्यासाठी 1 कोटी 33 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार 6 ग्रामीण रुग्णालय, 20 उपजिल्हा आणि महिला रुग्णालय, परभणी येथील हाडांचे उपजिल्हा रुग्णालय 12, तसेच 100 ते 200 बेडच्या रुग्णालयात 30, 201 ते 400 बेडच्या रुग्णालयात 40, आणि 400 बेड हुन अधिक क्षमता असलेल्या रुग्णालयात 50 सीसीटीव्हीची आवश्यकता आहे

या रुग्णालयात लागणार सीसीटीव्ही –

रुग्णालय नाव एकूण सीसीटीव्ही

- Advertisement -

नागपूर डागा महिला रुग्णालय 24

बुलढाणा जिल्हा रुग्णालय 64

परभणी जिल्हा रुग्णालय 39

अकोला महिला रुग्णालय 8

पुणे 19

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय 19

वर्धा जिल्हा रुग्णालय 6

सातारा जिल्हा रुग्णालय 22

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय 10

हिंगोली जिल्हा रुग्णालय 12

नंदूरबार जिल्हा रुग्णालय 14

जालना जिल्हा रुग्णालय 22

औरंगाबाद जिल्हा रुग्णालय 24

धुळे जिल्हा रुग्णालय 14

ठाणे सिव्हिल रुग्णालय 13

रायगड सिव्हिल रुग्णालय 27

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -