घरताज्या घडामोडीCorona Update: मुंबईत २४ तासांत १ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Corona Update: मुंबईत २४ तासांत १ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३८१ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. तर गेल्या ४८ तासांत ६२ कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ८७ हजार ५१३वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी ५ हजार ६१ मृत्यू झाले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे २४ तासांत १ हजार १०१ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ५९ हजार २३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट ६८ टक्के एवढा आहे. तर मुंबईतील दुप्पटीचा दर ४५ दिवसांवर गेला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

- Advertisement -

आज मुंबईत ८९७ संशयीत रुग्ण भरती झाले असून आतापर्यंत संशयीत रुग्ण भरती झालेल्यांची संख्या ६१ हजार ११ वर पोहोचली आहे. ४८ तासांत झालेल्या मृत्यूंच्या नोंदपैकी ५९ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच मृतांमध्ये ४९ रुग्ण पुरुष आणि १३ रुग्ण महिल्या होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ५ जणांचे वय ४० वर्षा खाली होते, ४१ जणांचे वय ६० वर्षावर होते, तर उर्वरित १६ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

मुंबईतील धारावीत आज ३ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून एकूण धारावीत कोरोनाग्रस्तांची संख्या २ हजार ३३८ झाली आहे. तर आज दादरमध्ये ४० तर माहिममध्ये २४ कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. त्यामुळे दादरमधील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार ४४ तर माहिममधील १ हजार २९९वर पोहोचली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासांत ६,६०३ कोरोनाबाधितांची नोंद, १९८ जणांचा मृत्यू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -