घरताज्या घडामोडीसाकीनाका गॅस सिलिंडर स्फोट; अजून एका मुलीचा मृत्यू

साकीनाका गॅस सिलिंडर स्फोट; अजून एका मुलीचा मृत्यू

Subscribe

साकीनाका येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका चाळीतील घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन ६ जण जखमी झाले होते. त्यापैकी तिघांचा बुधवारी रात्रीपर्यंत मृत्यू झाला. तर आणखीन एक गंभीर जखमी सानिया (१४) हिचा आज सकाळी (गुरुवारी)कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४ वर गेला आहे.

मंगळवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास साकीनाका, जगताप वाडी, जगताप इस्टेट, जरीमरी, आनंद भुवन येथे चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला होता. त्यावेळी जखमींना तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्याच दिवशी रात्री गंभीर जखमी अल्मस (१५) या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी उपचार सुरू असताना सायन रुग्णालयात अस्मा (६०) या महिलेचा मृत्यू झाला तर रात्री८ वाजताच्या सुमारास याच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रिहान खान (८) या मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे बुधवारी रात्रीपर्यंत मृतांचा आकडा ३ होता. मात्र आज (गुरुवारी)सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास सानिया (१४) या मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे आता या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४ वर गेला आहे. या दुर्घटनेतील गंभीर जखमी अनिस खान (४५) यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात तर शिफा (१६) हिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.

- Advertisement -

या दुर्घटनेत आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाल्याने साकीनाका परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उर्वरित दोघेजण मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्यासाठी नातेवाईक आणि मित्र परिवार ईश्वराकडे प्रार्थना करीत आहेत. तर रुग्णालयातील देवदूत त्यांना वाचविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.


हेही वाचा – ‘या’ व्यक्तींनी अनुभवली २६/११ची काळ रात्र

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -