मुंबईतील २२ उड्डाणपुलांखाली उद्यानांवर १५ कोटींचा खर्च

Mumbai
उड्डाणपुलांखालील उद्याने

मुंबईतील अनेक उड्डाणपुलांखालील वाहनतळांची जागा मोकळी करून त्याठिकाणी उद्याने विकसित केली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना उड्डाणपुलांखालीही उद्यानाचा लाभ मिळणार असून अजून २२ उड्डाणपुलांखाली नव्याने उद्यानाचा विकास केला जाणार आहे. त्यामुळे या उद्यानांचे सुशोभिकरण तसेच देखभाल याकरता तब्बल १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या ताब्यातील शहर विभागातील ०६, पश्चिम उपनरांतील ०७ आणि पूर्व उपनगरातील ०९ अशा एकूण २२ उड्डाणपुलाखालील जागांचा विकास करणे तसेच त्यांची पुढील अडीच वर्षांसाठी देखभाल करण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यासाठी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे यासाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली असून यावर अडीच वर्षाच्या देखभालीसह १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

महापालिका क्षेत्रातील विविध उड्डाणपूल, मेट्रो पूल व स्काय वॉक आदी प्रकारच्या पुलांखाली विकसित करण्यात येणा-या २२ उद्यानांमध्ये झाडे लावताना ती वेगवेगळ्या रंगाची असतील. यामुळे उद्यान उद्यान अधिकाधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी हेमालिया, दुरांटा, प्लंबॅगो, माल्पिजिया, ऍकॅलिफा, क्रोटॉन, बोगनवेल, सॅप्लेरा, फायकस, ऍरेका पाम, राफीस पाम आणि इक्झोरा यासारखी विविध रंगी झाडे या उद्यानांमध्ये लावली जाणार आहेत. या सर्व २२ उद्यानांतील झाडांसाठी पाणी व उद्यानांच्या इतर आवश्यक देखभालीसाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

उद्यानांच्या विकास कामांमध्ये काय असेल
या कामांमध्ये हिरवळीची व शोभिवंत रोपांची लागवड, जॉगिंग ट्ॅक, आकर्षक दिव्यांची रोषणाई, व्हर्टीकल उद्यान, संरक्षक भिंत, जाळी

शहर भाग
उद्याने : ०६ ,
खर्च : ३.१७ कोटी रुपये
कंत्राटदार : रिलायबल एंटरप्रायझेस

पश्चिम उपनगरे :
उद्याने : ०७,
खर्च : ३.४५ कोटी रुपये
कंत्राटदार : कोहिनूर डिस्ट्ब्यिूशन प्रायव्हेट लिमिटेड

पूर्व उपनगरे :
उदयाने : ०९
खर्च : ८:४१ कोटी रुपये
कंत्राटदार : रिध्दी एंटरप्रायझेस

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here