Wednesday, January 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मंगळवार, बुधवार मुंबईत १५ टक्के पाणीकपात

मंगळवार, बुधवार मुंबईत १५ टक्के पाणीकपात

येत्या ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते सायंकाळी ६ जानेवारीपर्यंत सकाळी १० वाजेपर्यंत २४ तास १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबईत ५ आणि ६ जानेवारी रोजी १५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या २४०० मिमी व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीवर आग्रा रोड व्हॉल्व संकुल ते पोगाव दरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंटच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येत्या ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते सायंकाळी ६ जानेवारीपर्यंत सकाळी १० वाजेपर्यंत २४ तास १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

या विभागांचा समावेश

शहर विभागातील ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘ई’, ‘जी/उत्तर’ व ‘जी/दक्षिण’ विभाग, तर पश्चिम उपनगरातील ‘एच/पूर्व’, ‘एच/पश्चिम’, ‘के/पूर्व’, ‘के/पश्चिम’, ‘पी/उत्तर’, ‘पी/दक्षिण’, ‘आर/उत्तर’, ‘आर/मध्य’, ‘आर/दक्षिण’ हे विभाग आणि पूर्व उपनगरातील ‘एल’, ‘एन’, ‘एस’ या विभागांचा समावेश आहे.

या विभागात पाणीकपात नसणार

- Advertisement -

शहर विभागातील, ‘एफ/ दक्षिण’ आणि ‘एफ/उत्तर’ आणि पूर्व उपनगरातील ‘एम/पूर्व’, ‘एम/ पश्चिम आणि ‘टी’ अशा पाच विभागात पाणीकपात लागू नसणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांना या पाणीकपातीमधून दिलासा मिळणार आहे.
मुंबईकरांनी पाणीकपात लागू होण्यापूर्वी आवश्यक पाण्याचा साठा करून त्याचा काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.


हेही वाचा – अकरावीच्या दुसर्‍या विशेष फेरीसाठी १ लाख ७ हजार जागा


- Advertisement -

 

- Advertisement -