घरमुंबईट्रान्स हार्बर मार्गाला 15 वर्षे पूर्ण

ट्रान्स हार्बर मार्गाला 15 वर्षे पूर्ण

Subscribe

ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गाला नुकतीच 15 वर्षे पूर्ण झाली. ठाणे आणि नवी मुंबईला जोडणारी ट्रान्सहार्बर रेल्वे सुरू झाली आणि हजारो प्रवाशांची मोठी सोय झाली. 9 नोव्हेंबर 2004 मध्ये कोपर खैरणे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गावरील पहिल्या लोकलला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. सुरूवातीस भकास दिसणार्‍या ट्रान्स मार्गावरील स्थानकांनी अल्पकाळात प्रवाशांची पसंती मिळवत सर्वाधिक सुरक्षित आणि सोईसुविधांनी समृद्ध असा मार्ग म्हणून प्रवाशांना आरामदायी प्रवास आजतागायत करता येत आहेत.

ट्रान्स हार्बर मार्गावर 9 नोव्हेंबर 2004 मध्ये पहिली लोकल धावली आणि या मार्गावरील उद्योगधंद्यांना अचानक गती आली. ठाणे-वाशी तर कालांतराने ठाणे-बेलापूर, ठाणे-पनवेल हा मार्ग सुरू झाल्यानंतर ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, रबाळे आदी स्थानकांच्या आसपास विविध नवीन कंपन्याही सुरू झाल्या. परिणामी ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढली आहे. विशेष म्हणजे ट्रान्स हार्बर हा मार्ग प्रवाशांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सर्वाधिक महत्वाचे म्हणजे गेल्या तीन वर्षांमध्ये ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे आणि ऐरोली या स्थानकांवरील प्रवासी संख्या लक्षात घेतल्यास या संख्येत तब्बल दहा हजारांहून जास्त वाढ झाली आहे.

- Advertisement -

ठाणे, वाशी आणि सानपाडा या मध्य व हार्बर मार्गाशी जोडलेल्या स्थानकांमधील ट्रान्स हार्बरच्या प्रवासी संख्येचा भार पेलणार्‍या स्थानकांचा समावेश नाही. दरम्यान, ठाणे स्थानकात गेल्या तीन वर्षांत सरासरी 20 हजार दैनंदिन प्रवासी वाढले आहेत. वाशी स्थानकात हाच आकडा सरासरी चार हजार एवढा आहे. त्याशिवाय नेरुळ, बेलापूर, पनवेल येथील प्रवासीही ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करतात. म्हणजेच गेल्या तीन वर्षांमध्ये ट्रान्स हार्बर मार्गावरील दैनंदिन प्रवासी संख्येत अंदाजे 40 ते 50 हजारांची वाढ झाली आहे. तसेच गेल्या तीन वर्षांमध्ये मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल फेर्‍यांमध्येही लक्षणीय वाढ केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -