घरमुंबईशहापुरात टायफाईडचे 157 रुग्ण

शहापुरात टायफाईडचे 157 रुग्ण

Subscribe

आदिवासींची सर्वाधिक संख्या

शहापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी वाड्या वस्त्यांवर तापाच्या साथीच्या आजारांनी एकच थैमान घातले आहे. दूषित पाणी व डासांच्या वाढत्या उपद्रवामुळे टायफाईड तापाचेे 1 ते 21 ऑगस्ट या महिन्यातील 21 दिवसांत एकूण 157 रुग्ण आढळून आले आहेत. हा तापाच्या रुग्णांचा आकडा वाढतच आहे. रोज 700 रुग्ण ओपडीत तपासणीसाठी येत आहेत, असे उपजिल्हा रुग्णालयातून सांंगण्यात आले.

या वाढत्या तापाच्या साथीमुळे येथील रहिवाशांत एकच भीती पसरली आहे. शहापूरच्या सरकारी उपजिल्हा रुग्णालयात सर्वाधिक तापाच्या साथीचा आकडा आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या प्रत्येक रुग्णाच्या रक्तचाचण्या घेतल्या जात असून तातडीने उपचार केले जात आहेत.

- Advertisement -

तापाच्या रुग्णांमध्ये आदिवासी पुरुष आणि महिलांचे प्रमाण जास्त आहे. शहापुरातील दूषित पाणी, उघड्यावरचे पदार्थ खाणे, वाहती गटारे, डुकरांचा वावर यामुळे तापाची साथ पसरल्याचे बोलले जात आहे. तापामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -