घरमुंबईएकाच दिवशी रेल्वे अपघातांत १६ जणांचा मृत्यू

एकाच दिवशी रेल्वे अपघातांत १६ जणांचा मृत्यू

Subscribe

रेकॉर्डब्रेक मृत्यूंचा गुरूवार

मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी रेल्वे वाहतूक सेवा दिवसेंदिवस प्रवाशांच्या लाईफला धोकादायक ठरत आहे.अपघात या रेल्वेला जरी नेहमीचेच असले तरी गुरूवारी मात्र अपघातांचा कहर झाला. गरूवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर विविध अपघातांत तब्बल 16 प्रवाशांचा मृत्यू तर 13 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार्‍या विविध उपाययोजना परिणामकारक ठरत नसल्याचे पुढे येत आहे. हे अपघात कुर्ला, ठाणे , डोंबिवली , कल्याण, वाशी, पनवेल, मुंबई सेंट्रल ,वांद्रे , बोरीवली आणि वसई अशा विविध स्थानकांवर झाले. रेल्वे रूळ ओलांडताना सर्वांत जास्त अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाय हाती घेण्यात येत असले तरीही त्यास यश आलेले नाही. मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावरील अपघातांमध्ये दररोज आठ ते दहा अपघातांची नोंद होते. परंतु, गुरुवारी रेल्वे अपघातात मृत पावणार्‍यांची संख्या १६आणि जखमींची संख्या १३ वर पोहोचली. या प्राणांतिक अपघातांमध्ये सर्वाधिक प्रमाण रेल्वे रुळ ओलांडतानाचे आहे.

- Advertisement -

प्रवाशांप्रमाणेच स्थानिकांनीही शॉर्टकट म्हणून रुळ न ओलांडण्याच्या रेल्वेचे आवाहन, योजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील लोकल प्रवासात दरवर्षी अपघातातील मृतांची संख्या वार्षिक तीन हजारांवर जात असून जखमींची संख्याही तितकीच आहे. ही सरासरी पाहता दरदिवशी अपघातातील मृतांची संख्या आठ ते दहापर्यंत जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -