Mumbai Corona: आज दिवसभरात १,६२० बाधितांची नोंद; ३६ जणांचा मृत्यू

सध्या मुंबईत २३ हजार ६९३ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू

मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ६२० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ३१ हजार ०७० वर पोहचली आहे. तर ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार ४६६ वर पोहचला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईत २३ हजार ६९३ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज १ हजार ९६८ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ९५ हजार ७७३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ८४ टक्क्यांवर

मुंबईमध्ये आज १ हजार ६२० नवे रुग्ण सापडले असून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३० जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २८ रूग्ण पुरुष तर ८ रूग्ण महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २८ जण हे ६० वर्षांवरील, तर ७ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. तर दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ८४% आहे.

राज्यात आज २,१२,४३९ अॅक्टिव्ह रुग्ण

राज्यात ७०८९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,३५,३१५ झाली आहे. राज्यात आज २,१२,४३९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ५१४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. आज १५,६५६ रुग्ण बरे होऊन घरी सोडले आहेत. राज्यात आजपर्यंत १२,८१,८९६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४९ टक्के एवढे झाले आहे.


Corona: परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण