Mumbai Corona: चिंताजनक! एकूण २३,९७६ Active रूग्ण; आज १ हजारांहून अधिकांना डिस्चार्ज

दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ८३%

Mumbai Corona Update
मुंबईची आकडेवारी

मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ६२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख १७ हजार ०९० वर पोहचली आहे. तर ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार १९९ वर पोहचला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईत २३ हजार ९७६ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज १ हजार ९६६ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ८१ हजार ४८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ८३%

मुंबईमध्ये आज १ हजार ८१३ नवे रुग्ण सापडले असून ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३७ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३३ पुरुष तर १४ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३७ जण हे ६० वर्षांवरील, तर ७ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. तर दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ८३% आहे.

धारावीत आज २२ कोरोना रूग्णांची नोंद

धारावीत आज २२ कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली असून धारावीतील बाधितांचा आकडा हा ३ हजार २८० वर पोहोचला आहे. यापैकी १९२ रूग्ण सध्या अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आणि दिलासादायक २ हजार ७९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.