घरमुंबईमुंबईतील तरुणाने तयार केले कचराकुंडी शोधायचे अॅप

मुंबईतील तरुणाने तयार केले कचराकुंडी शोधायचे अॅप

Subscribe

आपण लोकल ट्रेनपासून ते हॉटेल, सिनेमागृह शोधण्यासाठी आतापर्यंत मोबाईल अॅप वापरत होतो. आता कचराकुंडी शोधण्यासाठी देखील मुंबईतील तरुणाने अॅप तयार केले आहे.

देशभरात एकीकडे स्वच्छ भारत अभियान जोरदार राबवलं जात असताना. बऱ्याच ठिकाणी कचऱ्याकुंड्या या उपलब्ध नसतात. त्यावेळी कचरा टाकायचा कुठे? हा प्रश्न नागरिकांसमोर असतो. असाच प्रश्न मुंबईतील १७ वर्षाच्या ऋषी राणे तरूणाला पडला. ऋषी सांगतो,  गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मित्रांबरोबर फिरायला गेलो असताना आम्ही पॅकेज्ड फूड खाल्ले. त्यानंतर जवळ जवळ १५ ते २० मिनिटे त्या पॅकेज्ड फूडचा कचरा फेकण्यासाठी कचराकुंडी शोधत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले की, कचराकुंडी तर आहेत. पण नेमक्या त्या कचरा फेकायच्या वेळी सापडत नाहीत. कायमच घराबाहेर फिरताना कचरा कुठे टाकावा? हा प्रश्न सर्वांसमोर असतो किंवा कचराकुंडी अशा आडबाजूला कोपऱ्यात असतात की ते आपल्याला दिसतही नाही. तेव्हा आपल्या अजूबाजूच्या जवळच्या परिसरात कुठे कचराकुंडी आहे हे शोधण्यासाठी ऋषीने कचराकुंडी शोधण्यासाठी गारबो (Garbo) नावाचे मोबाईल अॅप तयार केले.

या अॅपच्या मदतीने मुंबईकरांना आपल्या परिसरातील कचराकुंडी कुठे आहे? हे शोधण्यास मदत होणार आहे. आपले शहर कचरामुक्त सुंदर दिसले पाहिजे या विचारातून वरळीच्या १७ वर्षीय ऋषी राणेने गारबो नावाचे मोबाईल अॅप तयार केले. हे अॅप तयार करण्यासाठी त्याला दोन आठवडे लागले. दररोज किमान पाच ते सहा तासापेक्षा अधिक वेळ ऋषी राणे या अॅपवर काम करत होता.

- Advertisement -

उन्हाळ्याच्या सुट्टीत केले अॅपवर काम

अॅप तयार करायचं हे ठरलं होतं. पण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये माझी परिक्षा सुरू असल्याने मी त्यासाठी काही खास वेळ देऊ शकलो नाही. परिक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टी दरम्यान मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंटर्नशीप करत असताना, मी तिथे अॅप डेव्हल्पमेंट शिकलो. त्याची मला गारबो अॅप तयार करताना खूप मदत झाली.

कसे आहे गारबो अॅप

अॅण्ड्राईड मोबाईलच्या गुगल प्लेस्टोर मधून गारबो (ऋषी राणे) हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे. या अॅपच्या मदतीने आपल्या आजुबाजूच्या परिसरातील कचराकुंडी आपल्याला शोधण्यास मदत होणार आहे. याशिवाय आपल्या विभागातील कचराकुंडी जर त्या अॅपमध्ये दाखवत नसतील तर अॅड मोर डस्टबिन या पर्यायावर क्लिक करुन त्या कचराकुंडीची नोंद करता येणार आहे. नागरिकांना कचराकुंडीचा लॅन्डमार्क हा गुगलमॅपच्या साहाय्याने शोधता येणार आहे. त्यामुळे ते अॅप वापरायला देखील सोपे आहे.

मी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मित्रांबरोबर फिरायला गेलो होतो. तेव्हा कचरा फेकण्यासाठी जवळ जवळ मला २० मिनिटं चालत जाऊन कचरा डबा शोधायला लागला. तेव्हाच आपण यावर काहीतरी करायला हवं या विचाराने मी तयारीला लागलो. हे अॅप तयार करण्यासाठी मला विठ्ठल घावडे यांनी मर्गदर्शन केले. या अॅपवर मी दरोरोज पाच ते सहा तास काम करत होतो. दोन आठवड्यानंतर ते तयार करण्यात यशस्वी झालो.

ऋषी राणे, गारबो अॅप निर्माता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -