पनवेलमध्ये डेंग्यूची भीती

पनवेल महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे १८ रुग्ण आढळले. नागरिकांना मलेरिया आणि डेंग्यू तापाची लागण होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रशिक्षित पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून औषध फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Mumbai
dengue in Mumbai
प्रातिनिधिक फोटो

पनवेल महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे १८ रुग्ण आढळले. नागरिकांना मलेरिया आणि डेंग्यू तापाची लागण होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रशिक्षित पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून औषध फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. डेंग्यू निर्मूलनाकरता पॅराथाम लिक्विडची फवारणी करून सांडपाण्यातल्या अळ्या नष्ट केल्या जात आहेत. पूर्वी पालिकेकडे फवारणीकरता कमी मशिन होत्या. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पत्रक, बॅनर्स लावून नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे.

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांनी डोके वर काढू नये, रोगराईला आळा बसावा यासाठी पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात नोटिसा बजावण्यात येत आहेत. यामध्ये २ हजार २२० गृहनिर्माण सोसायट्या, बंगले, ३१ भंगार विक्रेते, ८७ पंक्चर व्यावसायिक, ३१ नर्सरी, ६८ नारळ विक्रेते, १३५ इमारतींची बांधकामे सुरू असलेली ठिकाणे अशा मिळून २, हजार ६०० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या.

डेंग्यूपासून बचावासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरोघरी जाऊन कंटेनर सर्व्हे केला जात आहे. किमान बारावी सायन्स झालेल्यांची याकरता निवड करण्यात आली आहे. त्यांना प्रत्येक दिवसाला भत्ता दिला जात आहे. हे वर्कर्स घरोघरी जाऊन घरातील फुलदाण्या, ड्रम, टाक्या, कुंड्या, शोपिस, प्लास्टिक, फ्रिजरची तपासणी करत आहेत. ज्या ठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाचे डास अंडी घालतात. ज्यामुळे आजार फैलावतात त्याविषयी नागरिकांना माहिती देण्याचे काम केले जाते. त्याचबरोबर आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रशिक्षित पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून औषध फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. डेंग्यू रोखण्याकरता पॅराथाम लिक्विडची फवारणी करून अळ्या मारण्यात येत आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला साचलेला पालापाचोळा, डेब्रिज, प्लास्टिकच्या पिशव्या उचलणे, नाले, गटारांची साफसफाई, झाडेझुडपे, गवताची छाटणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर डास प्रतिबंधात्मक फवारणीही आरोग्य विभाग करत आहे. आपले घर, सोसायटी आणि परिसराची स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात राहणार्‍या नागरिकांना मलेरिया आणि डेंग्यू तापाची लागण होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. रोगराई फैलावू नये याकरता कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यास, यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.
– गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here