घरताज्या घडामोडीजीममध्ये व्यायाम करताना १८ वर्षीय तरूणाचा धक्कादायक मृत्यू

जीममध्ये व्यायाम करताना १८ वर्षीय तरूणाचा धक्कादायक मृत्यू

Subscribe

जीममध्ये त्याने केवळ डम्बेल्सचे दोनच सेट मारले आणि तो जमिनीवर कोसळला.

फिटनेससाठी हल्ली जीमकडे तरूणांचा जास्त कल दिसून येतो. पण व्यायाम चुकीच्या पद्धतीने केला तर तो जिवावरही बेतू शकतो. जीममध्ये व्यायाम करताना एका १८ वर्षीय तरूणाचा ह्रदयरोगाच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला आहे. जीममध्ये व्यायाम करताना अचानक तो खाली कोसळला. डॉक्टरांकडे नेताच तरूणाला मृत घोषित करण्यात आले.

अलीम हसन रजा पंजवानी असं मृत तरूणाचं आहे. तरूणाचे वय केवळ १८ वर्ष असून तो मुंबईच्या डोंगरी परिसरात राहत होता. शुक्रवारी सकाळी ९:१५ च्या दरम्यान ही घटना घडली.अलीम व्यायामासाठी जीम मध्ये गेला असता व्यायामा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

अलीम हा गेल्या सहा महिन्यांपासून डोंगरी येथील सदगुरू फिटनेस जीममध्ये व्यायमासाठी जात होता. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो जीमसाठी निघाला. जीममध्ये त्याने केवळ डम्बेल्सचे दोनच सेट मारले आणि तो जमिनीवर कोसळला. जीममधील काही माणसांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच प्रतिसाद न मिळाल्यानं अलीमला त्याच्या फॅमिली डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी अलीनला तपासून त्याला मृत घोषित केले.शवविच्छेदनासाठी जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले. अलीमचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले.

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -