पालघर येथे शाळेच्या बसला अपघात; १९ विद्यार्थी जखमी

पालघर येथील सर जे. पी. इंटरनॅशनल स्कूलच्या बसला माहीमजवळील पाणेरी नदीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात जवळ-जवळ१९ विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Mumbai
J.P International school
स्कूल बसचा भीषण अपघात

पालघर येथील सर जे. पी. इंटरनॅशनल शाळेच्या बसला पाणेरी नदीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात जवळपास १९ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील ४ विद्यार्थी आणि बसचालक गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटून बस जोरात झाडावर आदळली त्यामुळे हा अपघात घडला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

सर जे. पी. इंटरनॅशनल स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यास जात असताना हा भीषण अपघात घडला. या अपघातात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यातील दोन विद्यार्थ्यांना ढवळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

या अपघातात बसचा मात्र चक्काचूर झाला आहे. काही महिन्यांपूर्वी याच शाळेची एक सहा चाकी बस २५ किलोमीटरपर्यंत ५ चाकांवर धावली होती. जेव्हा या निष्काळजीपणाची तक्रार पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे केली तेव्हा त्यांच्याकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र, त्या निष्काळजीपणामुळे वारंवार या घटना घडत असल्याचे पालकांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here