भिवंडीत वीज कोसळून तरुणीचा मृत्यू

भिवंडीत शनिवारी संध्याकाळी वीज कोसळून एका १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Bhiwandi
19 year old girl died in bhiwandi due to lightning strike
भिवंडीत वीज कोसळून तरुणीचा मृत्यू

भिवंडीत वीज कोसळून एका तरुणीचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या चारही जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. शनिवारी वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह भिवंडीत मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, भिवंडीच्या अंबाडी ग्रामपंचायत हद्दीतील उंबरपाडा येथे वीज कोसळली. यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला. प्रमिला मंगल्या वाघे (१९) असे विजेच्या धक्याने ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर मंगल्या वाघे (५८),अलका वाघे (५०), मंजुळा वाघे (४५) , विजय (४ ) अशी जखमींची नांवे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

अंबाडी जवळील उंबरपाडा (कॉलनी) येथील शेतमजूर म्हणून काम करणारे मंगल्या वाघे यांनी गावातील भाऊ धाऊ पाटील यांची मक्त्याने (अर्धळ) शेती कसण्यासाठी घेतलेली आहे. त्यामुळे मंगल्या वाघे हे कुटुंबियांसह तानसा नदीकिनारी शेतीच्या कामासाठी गेले होते. शेतीचे कामकाज उरकून सायंकाळी ते कुटूंबियांसह घरी येण्यासाठी निघाले असता जोरदार वीजेचा कडकडाट झाला. यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली त्यात मुलगी प्रमिला वाघे हिचा जागीच मृत्यू झाला. तर मंगल्या वाघे, पत्नी अलका वाघे, मंजुळा वाघे आणि चार वर्षांचा नातू विजय अजय बोगे हे गंभीर जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी अंबाडी येथील जीवदानी आणि साईदत्त हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पालक मंत्री एकनाथ शिंदे, आमदार शांताराम मोरे आदींनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यांना सर्वोतोपरी सरकारी मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना दिले आहेत. घटनास्थळीचा पंचनामा तलाठी नरसूबा तुगावे, महिला पोलीस पाटील रुचिता पाटील यांनी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला आहे.


हेही वाचा – नागपुरात शाळेजवळ कोसळली वीज; आठ विद्यार्थी जखमी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here